‘कॅम्पा कोला’ प्रकरणाची आज सुनावणी

By Admin | Updated: June 3, 2014 01:08 IST2014-06-03T01:08:52+5:302014-06-03T01:08:52+5:30

वरळी येथील वादग्रस्त कॅम्पा कोला सोसायटीतील अनधिकृत मजले वाचवण्यासाठी तेथील रहिवाशांनी दाखल केलेल्या नवीन याचिकेवर आज, मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणीत होणार आह़े

Hearing of 'Campa Cola' case today | ‘कॅम्पा कोला’ प्रकरणाची आज सुनावणी

‘कॅम्पा कोला’ प्रकरणाची आज सुनावणी

>मुंबई : वरळी येथील वादग्रस्त कॅम्पा कोला सोसायटीतील अनधिकृत मजले वाचवण्यासाठी तेथील रहिवाशांनी दाखल केलेल्या नवीन याचिकेवर आज, मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणीत होणार आह़े या सुनावणीकडे सोसायटीतील 35 अवैध मजल्यांवरील 14क् फ्लॅटधारकांसह सर्व मुंबईकरांचे लक्ष लागले आह़े
विशेष म्हणजे येथील रहिवाशांच्या नवीन याचिकेवर सुनावणी घेणार असल्याचे गेल्या आठवडय़ात जाहीर करताना सर्वोच्च न्यायालयाने सोसायटीच्या अनधिकृत मजल्यांवरील कारवाईला कोणतीही स्थगिती दिली नव्हती़ असे असतानाही महापालिकेने या मजल्यांवर कारवाई करण्याची कोणतीही ठोस पावले उचली नसल्याचे तूर्तास तरी चित्र होत़े कारण अगदी सोमवार्पयत अवैध मजल्यांवर राहणा:या रहिवाशांनी फ्लॅटची चावी पालिकेकडे जमा केली नव्हती़
 मात्र अगदी शेवटच्या क्षणी जागी झालेल्या पालिकेने आता या रहिवाशांविरोधात न्यायालयाच्या अवमानतेची याचिका दाखल करण्याची तयारी केली असल्याची चर्चा होती़ दरम्यान, याबाबत अधिकृतरीत्या माहिती देण्यास पालिकेचा कोणताही अधिकारी तयार नव्हता़ ‘लोकमत’ने पालिका आयुक्त सीताराम कुंटे, अतिरिक्त आयुक्त मोहन अडताणी यांच्याशी वारंवार संपर्क साधला़ पण ते उत्तरासाठी उपलब्ध झाले नाहीत़ गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाने या सोसायटीतील अवैध मजल्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिल़े त्यानंतर आज वर्षभर ही कारवाई काही झाली नाही़ अखेर गेल्या महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने येथील रहिवाशांना घरे खाली करण्यासाठी अंतिम मुदत दिली़ ही मुदत संपत असतानाच पुन्हा येथील रहिवाशांनी अवैध मजले अधिकृत करण्यासाठी न्यायालयाचे दार ठोठावल़े 
या वेळी या रहिवाशांनी माहितीच्या अधिकाराचा दाखल देत राज्य शासन व पालिकेनेच अवैध बांधकामे अधिकृत करण्याचा निर्णय घेतल्याचा दावा केला आह़े तसेच हे प्रकरण पुन्हा मुंबई उच्च न्यायालयाकडे वर्ग करावे व तोर्पयत या मजल्यांवर कोणतीही कारवाई करू नये, अशी मागणीही याचिकेत करण्यात आली आह़े त्यामुळे आता न्यायालय नव्याने काय आदेश देणार याकडे सर्वाचेच लक्ष लागले आह़े 
 
आयुक्तांसोबत बैठक झाली
कॅम्पा कोला कम्पाउंड रहिवासी संघटनेच्या प्रवक्त्या नंदिनी मेहता म्हणाल्या, की सोमवारी रात्री मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, पालिका आयुक्त कुंटे व रहिवाशांची मंत्रलयात बैठक पार पडली़ त्यात आयुक्त कुंटे यांनी मंगळवारी पालिका कोणतीही कारवाई करणार नसून, कॅम्पा कोला रहिवाशांविरोधात सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करणार असल्याचे सांगितल़े 

Web Title: Hearing of 'Campa Cola' case today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.