बाळासाहेबांच्या मृत्युपत्रवर सुनावणी

By Admin | Updated: July 9, 2014 02:02 IST2014-07-09T02:02:42+5:302014-07-09T02:02:42+5:30

दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे मृत्युपत्र त्यांनीच तयार केले आहे की नाही या मुद्दय़ावर उच्च न्यायालयात सुनावणी होणार आह़े

Hearing on Balasaheb's book | बाळासाहेबांच्या मृत्युपत्रवर सुनावणी

बाळासाहेबांच्या मृत्युपत्रवर सुनावणी

मुंबई : दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे मृत्युपत्र त्यांनीच तयार केले आहे की नाही या मुद्दय़ावर उच्च न्यायालयात सुनावणी होणार आह़े
यासह हे मृत्युपत्र तयार करताना बाळासाहेब शारीरिक, मानसिकरित्या सक्षम होते का़, हे मृत्युपत्र तयार करण्यासाठी बाळासाहेबांवर शिवसेना पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी दबाव आणला होता का किंवा उद्धव यांनी ते तयार करताना काही गैरप्रकार केला आहे का़ तसेच उद्धव हे प्रोबेट करू शकतात का, या मुद्दय़ांवरही न्यायालयात 25 ऑगस्टला सुनावणी होणार आह़े मृत्युपत्रत काही गैरप्रकार झाल्याचे उघड झाल्यास योग्य ती कारवाई केली जाईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. (प्रतिनिधी)

 

Web Title: Hearing on Balasaheb's book