शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य संचालक पवार यांची अखेर गच्छंती

By admin | Updated: December 10, 2015 03:15 IST

राज्याच्या आरोग्य सेवा संचालकपदी डॉ. सतीश पवार यांची झालेली निवड बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरविली. संचालकपदासाठी राज्य लोकसेवा आयोगाने नव्याने प्रक्रिया राबवावी

नागपूर : राज्याच्या आरोग्य सेवा संचालकपदी डॉ. सतीश पवार यांची झालेली निवड बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरविली. संचालकपदासाठी राज्य लोकसेवा आयोगाने नव्याने प्रक्रिया राबवावी, असा आदेश न्या. दीपक मिश्रा आणि न्या. पी. सी. पंत यांच्या खंडपीठाने दिला. डॉ. पवार यांची जून २०१३ मध्ये आरोग्य संचालकपदी एमपीएससीने निवड केली होती. मात्र, या निवडीच्या प्रक्रियेला सदर पदाचे एक दावेदार असलेले डॉ. मोहन जाधव यांनी महाराष्ट्र प्रशासनिक लवादाकडे (मॅट) आव्हान दिले होते. या पदासाठीच्या पात्रता निकषात बसत असूनही एमपीएससीने डावलले, असे डॉ. जाधव यांचे म्हणणे होते. मॅटने डॉ. पवार यांची नियुक्ती रद्दबातल ठरविली होती. त्याला डॉ. पवार यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. उच्च न्यायालयाने मॅटच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले होते. त्यानंतर डॉ. पवार यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. तेथेही त्यांची निवड आज रद्दबातल ठरली. डॉ. पवार हे आरोग्य सेवा संचालनालयामध्ये मोठे प्रस्थ मानले जाते. प्रत्येक अपिलाच्या वेळी न्यायालयाने दिलेल्या अंतरिम स्थगितीमुळे डॉ. पवार इतके दिवस पदावर राहू शकले होते. मात्र आता त्यांना हे पद सोडणे अपरिहार्य आहे. (विशेष प्रतिनिधी)