शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

आरोग्य विभागाचा निर्णय बेकायदा, धनंजय मुंडे यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 06:50 IST

सार्वजनिक आरोग्य विभागाने २२६ अधिकाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय ५८ वरून ६० वर्षे करण्याबाबत काढलेला आदेश बेकायदा असून मंत्रिमंडळाची मान्यता घेऊन सर्व पदांच्या सेवाप्रवेश नियमातील बदल अधिसूचित करण्याची प्रक्रिया राबविली नाही, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे.

- अतुल कुलकर्णीमुंबई : सार्वजनिक आरोग्य विभागाने २२६ अधिकाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय ५८ वरून ६० वर्षे करण्याबाबत काढलेला आदेश बेकायदा असून मंत्रिमंडळाची मान्यता घेऊन सर्व पदांच्या सेवाप्रवेश नियमातील बदल अधिसूचित करण्याची प्रक्रिया राबविली नाही, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.लोकमतने हा विषय समोर आणला होता. आरोग्य विभागाने अधिकाºयांच्या सेवानिवृत्तीच्या वयात वाढ करण्यापूर्वी तसा प्रस्ताव तयार करणे आवश्यक होते. आर्थिक भार किती व कसा पडणार याचा अभ्यास करून तो सविस्तर कारणांसह सामान्य प्रशासन, वित्त, विधि व न्याय या विभागांकडे अभिप्रायासाठी पाठवायला हवा होता. असा प्रस्ताव मंत्रिमंडळापुढे येणे, त्याला मंजुरी मिळणे व त्यानंतर सर्व पदांच्या सेवाप्रवेश नियमातील बदल कायद्याचा आधार घेऊन केल्यानंतरच असे वय वाढवणे योग्य ठरले असते. मात्र हे काहीही केले गेले नाही. कारण या प्रकरणात आरोग्यमंत्र्यांच्या कार्यालयातील डॉ. नितीन बिलोलीकर व त्यांच्या पत्नी सरोजनी बिलोलीकर यांना थेट लाभ मिळवून देण्यासाठी असे आदेश काढले गेल्याचेही मुंडे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. या निर्णयामुळे विभागातील पात्र अधिकाºयांच्या पदोन्नत्याही रखडल्या. परिणामी विभागात असंतोष निर्माण झाल्याचेही मुंडे यांनी म्हटले आहे.या निर्णयामुळे राज्यातील स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून शासनाच्या सेवेत प्रवेश करू इच्छिणाºया लाखो विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कारण या निर्णयाचा आधार घेत अन्य विभागही हीच पद्धती अवलंबण्याची दाट शक्यता आहे. यामुळे शासकीय पद भरतीवरच मोठ्या प्रमाणात विपरीत परिणाम होऊन आधीच बेरोजगारीच्या दुष्टचक्रात अडकलेल्या लाखो तरुण मुलांच्या अडचणीत भर टाकण्याचे काम केले गेले आहे. या संपूर्ण प्रकरणाची विधिग्राह्यता तत्काळ तपासणे गरजेचे आहे. कारण या संपूर्ण प्रकरणात ‘कॉन्फील्क्ट आॅफ इंटरेस्ट’ निर्माण झाल्याने याबद्दल शासनाची भूमिका स्पष्ट होणे गरजेचे असल्याचे मुंडे लोकमतशी बोलताना म्हणाले....हा तर गोपीनाथ मुंडे यांचा अवमानगोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार महामंडळ सुरू होण्याआधीच ते गुंडाळणे हा राज्यातील लाखो ऊसतोड कामगारांचाच नव्हे तर गोपीनाथ मुंडे यांचाही अवमान आहे, अशी टीकाही मुंडे यांनी केली.

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार