शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य विभागाने काढली ११ हजार पदांची जाहिरात, रिकामी पदे भरण्यासाठी तत्काळ भरती मोहीम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2023 05:24 IST

आरोग्य विभागातील अनेक वरिष्ठ पदे रिक्त असून, काही अधिकारी पद उन्नत करून वर्णी लावण्यात मश्गुल असल्याचे वृत्त १७ ऑगस्ट रोजी ‘लोकमत’ने प्रकाशित केले.

मुंबई : कनिष्ठ अधिकारी वरिष्ठ पदावर बसवून अतिरिक्त कार्यभार देण्याचा संसर्ग झालेल्या राज्याचा सार्वजनिक आरोग्य विभाग अखेर शुद्धीवर आला आहे. संचालक पदापासून ते शिपाई पदापर्यंतच्या मोठ्या प्रमाणात या विभागात जागा रिकाम्या असल्याने रुग्णांच्या आरोग्यसेवेवर परिणाम होत असल्याचे वृत्त लोकमतने प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत रिकामी पदे तत्काळ भरण्याची मोहीम आरोग्य विभागाने हाती घेतली असून ‘क’ आणि ‘ड’ श्रेणीतील  १० हजार ९४९ पदांसाठी जाहिरात काढली आहे. 

आरोग्य विभागातील अनेक वरिष्ठ पदे रिक्त असून, काही अधिकारी पद उन्नत करून वर्णी लावण्यात मश्गुल असल्याचे वृत्त १७ ऑगस्ट रोजी ‘लोकमत’ने प्रकाशित केले. आरोग्य विभागात संचालकपदापासून ‘गट क’ आणि ‘ड’ स्तरावरील हजारो पदे रिक्त असल्याचे त्यात नमूद केले होते. त्यामुळे आरोग्य विभागात खळबळ उडाली होती. आरोग्य विभागावर टीकेची झोड उठली होती.  अखेर सोमवारी  आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी भरती प्रक्रिया पुन्हा सुरू होतील, असे  स्प्ष्ट केले. 

वरिष्ठ अधिकाऱ्याची पदे केव्हा भरणार? सध्या सार्वजनिक आरोग्य विभागात २ संचालक, ४ अतिरिक्त संचालक, ५ सहसंचालक, २३ उपसंचालक ही प्रमुख पदे रिकामी आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्गातील १२१, जिल्हा शल्यचिकित्सक संवर्गातील ३३८, तज्ज्ञ डॉक्टरांची ४७९, अ श्रेणीतील वैद्यकीय अधिकाऱ्यांची ९८३, ब श्रेणीतील अधिकाऱ्यांची २३८ पदेही रिक्त आहेत. 

टॅग्स :Healthआरोग्यTanaji Sawantतानाजी सावंत