शाळांमध्ये साजरा होणार आरोग्य दिवस

By Admin | Updated: March 4, 2017 06:00 IST2017-03-04T06:00:29+5:302017-03-04T06:00:29+5:30

जागतिक आरोग्य संघटनेकडून दरवर्षी ७ एप्रिल हा दिवस संपूर्ण जगभरात जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला

Health Day to be observed in schools | शाळांमध्ये साजरा होणार आरोग्य दिवस

शाळांमध्ये साजरा होणार आरोग्य दिवस


मुंबई : जागतिक आरोग्य संघटनेकडून दरवर्षी ७ एप्रिल हा दिवस संपूर्ण जगभरात जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. त्यामुळे मानव संसाधन विकास मंत्रालय, शालेय शिक्षण एवं साक्षरता विभाग, भारत सरकार यांनीही हा दिवस सर्व शाळांमधून ‘आरोग्य दिवस’ म्हणून साजरा करण्याचे जाहीर केले आहे.
७ एप्रिल रोजी सर्व माध्यमांच्या, सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमधून हा दिवस साजरा करण्याविषयी सूचना करण्यात आल्या आहेत. या दिवसाच्या निमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे, स्वयंसेवी संस्थांनीही पुढाकार घेऊन विविध उपक्रम राबवावे असे सुचविले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Health Day to be observed in schools