शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

सीएसआर खर्चातून आरोग्य सेवा ‘सुदृढ’; राज्य शासनाच्या आरोग्य विभागाचे नवे धोरण जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2024 06:53 IST

ठोस धोरण तयार करण्यात आल्याने राज्यातील आरोग्य सेवेसाठी कॉर्पोरेट कंपन्यांची मदत घेणे सोपे होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाला नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी वारंवार सीएसआर निधी देण्यासाठी इच्छुक असतात. मात्र, तो निधी कशा पद्धतीने घ्यावा, त्याची अंमलबजावणी कशा पद्धतीने करावी याबाबत कोणतेच धोरण नसल्याने हा निधी स्वीकारण्यासाठी विभागाला अडचणी येत होत्या. मात्र, आता त्याबाबत ठोस धोरण तयार करण्यात आल्याने राज्यातील आरोग्य सेवेसाठी कॉर्पोरेट कंपन्यांची मदत घेणे सोपे होणार आहे.

नव्या धोरणात कॉर्पोरेट कंपन्यांतून प्राप्त झालेला निधीचा वापर करण्यासाठी विविध सुविधा निश्चित करण्यात आल्या आहेत. उपासमार, दारिद्र्य, कुपोषण निर्मूलन, व्यवसायाभिमुख आणि रोजगाराभिमुख प्रशिक्षण, स्त्री-पुरुष समानता व महिला सक्षमीकरणासाठी कार्यक्रम राबविणे, महिला आणि अनाथ मुलांसाठी घरे व वसतिगृह, ज्येष्ठ नागरिकांसाठी वृद्धाश्रम, डे केअर सेंटर अशा सुविधांचा समावेश आहे.   सीएसआरअंतर्गत १० लाखांपर्यंत प्रकल्पांना मान्यता देण्यासाठी जिल्हा स्तरावर सीएसआर समिती स्थापन करण्यात आली असून, जिल्हाधिकारी त्याच्या अध्यक्षपदी असतील.

सहा महिन्यांतून किमान एकदा बैठक

या निधीचा वापर योग्य पद्धतीने व्हावा याकरिता काहीअंतर्गत समित्यांची स्थापनाही करण्यात आली आहे. १० कोटींपेक्षा जास्त खर्च लागणाऱ्या प्रकल्पांना मान्यता देण्यासाठी नियामक समिती असेल. या समितीची बैठक सहा महिन्यांतून किमान एकदा घेण्यात येईल. सार्वजनिक आरोग्यमंत्री या समितीचे अध्यक्ष असतील, तर सहसंचालक (रुग्णालये) सदस्य सचिव असतील. या समितीमध्ये आरोग्य विभागाच्या संचालकांचाही समावेश असेल.

समन्वय कक्ष सुरू

१ ते १० कोटींपर्यंतच्या खर्चाच्या प्रकल्पांना मान्यता देण्याचे काम सुकाणू समितीकडे आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव या समितीच्या अध्यक्षपदी असतील, तर एक कोटीपर्यंत खर्च लागणाऱ्या प्रकल्पांच्या मंजुरीसाठी आयुक्त स्तरावरील समन्वय समिती तयार करण्यात आली असून, आरोग्य सेवा आयुक्त किंवा संचालक त्याचे अध्यक्ष असतील. विशेष म्हणजे यासाठी आयुक्त स्तरावर विशेष सीएसआर समन्वय कक्ष सुरू करण्यात आला आहे.

टॅग्स :Healthआरोग्यMaharashtraमहाराष्ट्रdoctorडॉक्टर