शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

त्याची आधी ऑनलाईन फसवणूक झाली, आता तो लोकांना फसवतो 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2017 5:50 PM

शासनमान्य इ-महासेवा केंद्र मिळवा असा एसएमएस करत लाखो रुपयाचा ऑनलाईन गंडा घालणा-या एका सायबर गुन्हेगारास औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी नागपूर येथून ताब्यात घेतले आहे.

ठळक मुद्दे एक वर्षापूर्वी ऑनलाईन लॉटरीच्या माध्यमातून आरोपीची फसवणूक झाली  होती.वेबसाईटच्या माध्यमातून त्याने लोकांना इ-महासेवा केंद्र मिळवा अशा आशयाचे एसएमएस केले व त्यासाठी १५१०० रु ऑनलाईन मागवायचा

औरंगाबाद : शासनमान्य इ-महासेवा केंद्र मिळवा असा एसएमएस करत लाखो रुपयाचा ऑनलाईन गंडा घालणा-या एका सायबर गुन्हेगारास औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी नागपूर येथून ताब्यात घेतले आहे. तब्बल एक वर्षापासून बनावट वेबसाईटच्या माध्यमातून आरोपीने साथीदाराच्या मदतीने विविध राज्यात ८० जणांना गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. 

याप्रकरणी पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी माहिती दिली की, शेखर ओमप्रसाद पोदार (32) असे आरोपीचे नाव आहे. तो आठवी पास असून नागपुरमध्ये जरीपटका येथे राहतो. एक वर्षापूर्वी ऑनलाईन लॉटरीच्या माध्यमातून त्याची फसवणूक झाली  होती. यातून आपणही अशी फसवणूक करू शकतो अशी कल्पना त्याला सुचली. यानंतर  मित्राच्या मदतीने त्याने एक वेबसाईट सुरु केली. या वेबसाईटच्या माध्यमातून त्याने लोकांना इ-महासेवा केंद्र मिळवा अशा आशयाचे एसएमएस केले. यासाठी तो प्रत्येकी १५१०० हजार रुपये ऑनलाईनच्या माध्यमातून जमा करायचा. 

याचा फटका औरंगाबादच्या वदोडबाजार येथील रमेश कुलकर्णी यांना बसला. त्यांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवल्यानंतर तपासाचे चक्र फिरवत शेखर याला नागपूर येथून ताब्यात घेतले. शेखर व त्याच्या साथीदारांनी या वेबसाईटद्वारे देशातील जवळपास ८०  जणांची फसवणूक केली असून यातून ५० लाख रुपये हडपले आहेत. त्याच्या विरुद्ध उत्तरप्रदेश, नागपूर व औरंगाबादेत गुन्हे नोंद आहेत. न्यायालयात हजर केले असता त्याला ४ दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.