शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

‘हा’ तर अतिरेकी, मी सही करणार नाही; आव्हाडांनी सांगितला ‘आमदार’कीचा किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2021 07:30 IST

'लोकमत’च्या ‘फेस टू फेस’ या कार्यक्रमात आव्हाड यांनी ‘लोकमत’चे वरिष्ठ साहाय्यक संपादक अतुल कुलकर्णी यांच्यासोबत साधलेल्या संवादात आपला राजकीय प्रवास सांगितला.

ठळक मुद्देसुरेश कलमाडी यांनी सर्वप्रथम मला शरद पवार यांच्याकडे नेले. त्यानंतर पद्मसिंह पाटील यांच्यासोबतही माझे चांगले संबंध होते. आपला सतत ‘शरद पवार यांचा चमचा’ म्हणून होत असलेला उल्लेख टाळण्यासाठी जिद्दीने मी विधानसभेत लोकांमधून निवडून आलोपवार हे दिल्लीवरून विमानतळावर आले तरी मी त्या ठिकाणी उभा असायचो

मुंबई : विधान परिषदेच्या बारा सदस्यांच्या यादीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी माझे नाव दिले. मात्र तत्कालीन राज्यपाल पी. सी. अलेक्झांडर यांनी माझ्या नावावर सही करायला नकार दिला. त्यांनी सांगितले, हा तर अतिरेकी आहे. मी याच्या नावावर सही करणार नाही. शरद पवार यांनी कारण विचारले तेव्हा राज्यपालांनी सांगितले, याने तर ब्रिच कँडी क्लब फोडला होता. तेव्हा त्यांना वस्तुस्थिती समजावून सांगितली गेली आणि मी आमदार झालो! आजपर्यंत कधीही बाहेर न आलेला हा किस्सा सांगितला गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी!

‘लोकमत’च्या ‘फेस टू फेस’ या कार्यक्रमात आव्हाड यांनी ‘लोकमत’चे वरिष्ठ साहाय्यक संपादक अतुल कुलकर्णी यांच्यासोबत साधलेल्या संवादात आपला राजकीय प्रवास सांगितला. त्याचवेळी आपला सतत ‘शरद पवार यांचा चमचा’ म्हणून होत असलेला उल्लेख टाळण्यासाठी जिद्दीने मी विधानसभेत लोकांमधून निवडून आलो, तो माझ्या आयुष्यातील सगळ्यांत मोठा आनंद होता, असेही त्यांनी स्पष्ट केले. नारायण राणे त्यावेळी काहीतरी गडबड करणार होते. आपल्या पक्षाचे आमदार फुटणार, त्या बदल्यात त्यांना विधान परिषदेवर संधी देण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती शरद पवार यांना मिळाली. याबाबतचा पडद्यामागचा प्रवासही आव्हाड यांनी मांडला. ही संपूर्ण मुलाखत लोकमत यू ट्यूबवर सोबतचा क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर पाहायला मिळेल.

शरद पवारांबद्दलही सांगितला किस्सासुरेश कलमाडी यांनी सर्वप्रथम मला शरद पवार यांच्याकडे नेले. त्यानंतर पद्मसिंह पाटील यांच्यासोबतही माझे चांगले संबंध होते. शरद पवार हे दिल्लीवरून विमानतळावर आले तरी मी त्या ठिकाणी उभा असायचो आणि ते जात असले तरी मी विमानतळावर उभा असायचो. ते कोणत्याही ठिकाणी गेले तरी मी विमानतळावर जायचो. जवळजवळ १२ वर्षे मी हे केले. आधी त्यांचे लक्ष नसायचे; पण त्यांना माझा चेहरा परिचयाचा वाटायला लागला तेव्हा त्यांनी ओळखही देण्यास सुरुवात केली, असे आव्हाड म्हणाले.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवार