शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

आईचे स्वप्न पूर्ण करण्याचा संकल्प ''सार्थक''...कोल्हापूरच्या युवकाची प्रेरणादायी यशोगाथा..

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2019 16:54 IST

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीची तयारी करत असताना आईचे अपघाती निधन झाले. मात्र, तो खचला नाही...

ठळक मुद्देरिक्षा चालकाचा मुलगा झाला लष्करी अधिकारीकोल्हापुरच्या सार्थक धवनची यशोगाथा एनडीए महाराष्ट्रात पण एनडीएत महाराष्ट्र नाही

पुणे : घरची परिस्थिती बेताची...मुलांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी रोज रिक्षा चालवून वडिलांनी शिकविले. ज्या कष्टाने त्यांनी शिकवले त्यांचे ऋण फेडण्यासाठी तसेच त्यांना सन्मानाने जगता यावे यासाठी लष्करात जाण्याचा मार्ग निवडला. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीची तयारी करत असताना आईचे अपघाती निधन झाले. मात्र, तो खचला नाही. मोठ्या धैर्याने घरी कुठलेही लष्करी पाठबळ  नसताना राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीची परीक्षा पास झाला. सुरवातीचे दोन वर्ष कठीण गेले. मात्र, मित्रांचा आणि प्रशिक्षकांच्या मदतीने प्रबोधिनीत पहिल्या चार विद्यार्थ्यांमध्ये त्याने स्थान मिळवले. सार्थक धवन असे या विद्यार्थ्याचे नाव असून तो मुळचा कोल्हापूर येथील रहिवासी आहे. सामान्य घरातील मुलगा ते लष्करी अधिकारी होण्यापर्यंतचा त्याचा प्रवास थक्क करणारा आहे.राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी देशातील लष्करी अधिकारी तयार करणारी मानाची संस्था आहे. लहानपणापासून लष्करात दाखल होण्याचे स्वप्न धवन  याने पाहिले. घरची परिस्थिती बेताची होती. वडील दिवसभर रिक्षा चालवायचे. आम्हाला शिकवताना त्यांची ओढाताण व्हायची. मात्र ते डगमगले नाहीत. त्यांना मानाने जगता यावे यासाठी लष्कराचा मार्ग निवडला असे धवन म्हणाला. लष्करात देशसेवा करतांना मिळणारा मान मोठा असतो. इतर कुठल्याही सेवेत या प्रकारचा सन्मान मिळत नाही. १० पर्यंतचे शिक्षण कोल्हापूर येथून पूर्ण केले. ओंरगाबाद येथील एका विद्यालयातून १२ वीचे शिक्षण घेतले आणि राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीची तयारी केली. वडिलांचे अनेक मित्र लष्करात होते. यामुळे त्यांच्यापासून लष्करात दाखल होण्याची दाखल होण्याची प्रेरणा मिळाली. जिद्दीने अभ्यास केला. मात्र, दरम्यानच्या काळात आईचे अपघाती निधन झाले. आईच्या आकस्मिक निधनामुळे मोठा धक्का बसला. तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याने जिद्दीने अभ्यास केला. आज माझे यश पाहायला ती नाही. ती आज असती तर माझ्या यशाने तिचे उर भरून आले असते, असे धवन म्हणाला. त्याच्या या प्रवासात माझ्या भावाने मला मोठा पाठिंबा दिला. एनडीएत आल्यानंतर सुरूवातीचे दोन वर्ष खूप त्रासदायक गेले. मात्र, मित्रांनी आणि प्रशिक्षकांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे हे खडतर प्रशिक्षण पूर्ण करू शकलो. आर्मी कॅडेट असल्यामुळे राष्ट्रीय रक्षा अकादमीत पुढील प्रशिक्षणासाठी जाणार असून भविष्यात देशाचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक सर्व कौशल्य आत्मसात करणार असल्याचे धवन म्हणाला. ............एनडीए महाराष्ट्रात पण एनडीएत महाराष्ट्र नाहीदेशासाठी लष्करी अधिकारी तयार करणारी मानाची असलेली राष्ट्रीय संरक्षण प्रबोधीनी महाराष्ट्रात आहे. संपूर्ण देशभरातून येथे विद्यार्थी  येतात. मात्र, राज्यातील विद्यार्थ्यांचे निवड होण्याचे प्रमाणात खूप कमी आहे. मराठी मुलांनी  महाराष्ट्रातील या महत्वाच्या आणि मानाच्या संस्थेत मोठ्या प्रमाणावर भरती व्हावे. यासाठी त्यांना आवश्यक असलेले मार्गदर्शन मिळण्याची व्यवस्था व्हावी असे धवन म्हणाला. --------------------------

टॅग्स :Puneपुणेnda puneएनडीए पुणेauto rickshawऑटो रिक्षा