‘त्याने’ सामान नव्हे तर, आयुष्यच चोरले...
By Admin | Updated: November 24, 2014 02:56 IST2014-11-24T02:56:03+5:302014-11-24T02:56:03+5:30
गुलबर्ग्यात देवदर्शन करून एका वृद्ध दाम्पत्याने पॅसेंजर पकडली. गाडीत बसताना जवळचे होते, ते सगळे चोरीला गेले. याचा धक्का बसला आणि वृद्धेचा मृत्यू झाला

‘त्याने’ सामान नव्हे तर, आयुष्यच चोरले...
जगन्नाथ हुक्केरी, सोलापूर
गुलबर्ग्यात देवदर्शन करून एका वृद्ध दाम्पत्याने पॅसेंजर पकडली. गाडीत बसताना जवळचे होते, ते सगळे चोरीला गेले. याचा धक्का बसला आणि वृद्धेचा मृत्यू झाला. पतीही हबकून गेला, काय करावे काहीच सुचेना. गाडी सोलापूर स्थानकावर आल्यावर आणि मृतदेह उतरविण्यात आला. अंत्यविधी करण्याची पंचाईत झाली, अशा हृदय हेलावणाऱ्या दृश्याने रेल्वे स्थानकही गहिवरून गेले
मूळचे भिवंडीचे असलेले उमेश देवरसनी (६५) व पत्नी नागमणी (५५) हे दाम्पत्य गुलबर्ग्याजवळ असलेल्या गावी देवदर्शनासाठी गेले होते. भिवंडीला परतण्यासाठी त्यांनी गुलबर्गा-विजापूर पॅसेंजर पकडली. गाडीत बसत असताना चोरट्यांनी त्यांच्या सामानावर डल्ला मारला. होते नव्हते, ते सगळे चोरीला गेले. आता घर कसे गाठायचे, हा प्रश्न पडला. नागमणी यांना या घटनेचा धक्का बसला आणि त्यांनी देह ठेवला. पत्नीच्या मृत्यूने उमेश यांना काहीच सुचेना. रात्री सोलापूर स्थानकावर गाडी आल्यानंतर प्लॅटफॉर्म क्र. तीनवर मृतदेह ठेवण्यात आला. सोबत खिन्न होऊन बसलेला पती आणि सगळे बघ्याच्या भूमिकेत.
मृतदेह शवविच्छेदनासाठी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात पाठविण्यात आल्यानंतर उमेश यांना प्रवासी संघटनेने लोहमार्ग पोलिसांचा आश्रय मिळवून दिला.