राम शिंदेंबरोबरच्या फोटोतील 'तो' आरोपी नाही

By Admin | Updated: July 17, 2016 18:56 IST2016-07-17T18:49:30+5:302016-07-17T18:56:46+5:30

संतोष भावळ या आरोपीचा जो राम शिंदे यांच्यासोबत असलेला फोटो सध्या सोशल मिडियावर फिरत आहे, ती व्यक्ती दुसरी आहे, अशी माहिती पुढे आली आहे. फोटो मधील...

He is not an accused in the photograph with Ram Shinde | राम शिंदेंबरोबरच्या फोटोतील 'तो' आरोपी नाही

राम शिंदेंबरोबरच्या फोटोतील 'तो' आरोपी नाही

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १७ : अहमदनगर येथिल कर्जत तालुक्यातील कोपर्डीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन तिला जिवे मारन्यात आल्याची घटना घडली होती. या प्रकरणातील आरोपीनां पोलीसांनी अटक केले आहे. या आरोपी मधील संतोष भावळ याचा फेसबुक मंत्री राम शिंदे बरोबरचा फोटो सध्या व्हायरल होत आहे. पण मिळालेल्या माहीतीनुसार फोटो मधील संतोष हा आरोपी नाही. तो दुसराच संतोष आहे.
संतोष भावळ या आरोपीचा जो राम शिंदे यांच्या सोबत असलेला फोटो सध्या सोशल मिडियावर फिरत आहे, ती व्यक्ती दुसरी आहे, अशी माहिती पुढे आली आहे. फोटो मधील संतोष भवाळ खरा आहे, तो नान्नज येथिल रहिवाशी आहे. पण तो या प्तीरकरणातील आरोपी नाही. एकाच नावाचे दोन व्यक्ती आहेत. यामध्ये फक्त नामसाधर्म्य आहे. आरोपी वेगळाच आहे,  संतोष भावळ (राम शिंदे बरोबरचा फोटो व्हयरल झालेला) यांनी जमखेड पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद नोंदवली आहे.

दरम्यान, आरोपी संतोष भवाळ यांचा फेसबुक वर पालकमंत्री राम शिंदे यांच्या सोबतच् फोटो आहेत. आरोपीच जर मंत्र्याच्या सोबत दिसत असेल तर कारवाई कशी होणार. प्रकरण दाबणाऱ्या अधिकार्यांनवर कारवाई व्हावी, उच्चस्तरिय चौकशी करून फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. अशी मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.

पोलिस स्टेशनमध्ये तक्रार करताना संतोष भवाळ -

 

Web Title: He is not an accused in the photograph with Ram Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.