शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

नातवाचा हव्यास आणि भरभराटीच्या मोहापायी त्यांनी गमावले २६ लाख रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2018 20:56 IST

बेटी बचावचा नारा कितीही जोरात दिला जात असला तरी घराण्याला वारस हवा, याचा हव्यास काही केल्या सुटत नाही़ त्यातूनच मग नातवासाठी आणि घराच्या भरभराटीच्या बतावणीला बळी पडून.... 

 पुणे  - बेटी बचावचा नारा कितीही जोरात दिला जात असला तरी घराण्याला वारस हवा, याचा हव्यास काही केल्या सुटत नाही़ त्यातूनच मग नातवासाठी आणि घराच्या भरभराटीच्या बतावणीला खासगी कंपनीतील ज्येष्ठ कर्मचारी बळी पडला. पण, भरभराट राहिली दूरच तो स्वत:चे आणि निवृत्तीनंतर मिळालेले तब्बल २६ लाख रुपये गमवण्याची वेळ त्यांच्यावर आली़ मांजरी येथील ही धक्कादायक घटना उघडकीस आली असून हडपसर पोलिसांनी या भोंदुबाबाला अटक केली आहे़ त्याची साथीदार महिला मात्र फरारी झाली आहे़

सुनिल रामशरण सरोज (वय ५०, रा़ थिटे शाळेजवळ, खराडी) असे या भोदुबाबाचे नाव असून हडपसर पोलिसांनी जादुटोणा प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे़ 

याप्रकरणी समीर विलास कामठे (वय ३३, रा़ महादेवनगर, मांजरी) यांनी फिर्याद दिली आहे़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर यांचे वडिल कामठे हे एका खासगी कंपनीत कामाला होते़ तेथेच सुनिलही कॉट्रक्ट पद्धतीने कामाला आहे़ त्यातून त्यांचा परिचय झाला़ आपल्या मुलाला पहिल्या दोन्ही मुलीच आहेत़ मुलगा हवा असे त्यांनी सुनिलला सांगितले़ त्याने आपल्या ओळखीची एक महिला आहे़ तिने सांगितलेले उपाय केले तर हमखास मुलगा होईल, असे सांगून त्याने विलास कामठे यांना खराडी येथील महिलेकडे आॅक्टोबर २०१६ला घेऊन गेला़ सुनिल व या महिलेने त्यांना वश करुन आपण सांगू तसे करण्यास लावले़ नाही केले तर जादू टोण्याची भिती दाखविली़ तुम्ही आम्ही सांगितलेल्या गोष्टी केल्या तर मुलगा होईल व तुमच्या घरात आर्थिक भरभराट होईल, असे सांगितले़ व नाही केले तर तुमच्या घरावर अनिष्ट संकट येईल़ तुमच्या घरातील लोकांचे मृत्यु होईल अशी जादू टोण्याची भिती दाखविली़ त्यामुळे  विलास कामठे हे ते सांगतील तसे करत गेले़ गेल्या वर्षी त्यांनी एक वर्षे अगोदरच सेवा निवृत्ती घेतली़ सुनिल व या महिलेने आॅक्टोंबर २०१६ पासून वेळोवेळी त्यांच्याकडून ९ लाख रुपये रोख व १७ लाख २० हजार रुपये खात्यावर ट्रान्सफर करुन घेतले़ 

पोलिसांनी सुनिल सरोज याला अटक करुन सोमवारी न्यायालयात हजर केले़ सहायक सरकारी वकील किरण बेंडभर यांनी न्यायालयात सांगितले की, आरोपीकडून गुन्ह्यातील रक्कम हस्तगत करायची आहे़ मुलगा होईल म्हणून खराडी येथे आरोपीने वेगवेगही अघोरी उपाय केले आहेत़ त्याबाबत तपास करुन महिला साथीदाराला अटक करायची आहे़ न्यायालयाने त्याला ९ फेबुवारीपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे़ पोलीस निरीक्षक विश्वजित खुळे अधिक तपास करीत आहेत़  

पासबुकामुळे प्रकार उघडकीस

विलास कामठे यांना डिसेंबर २०१७ मध्ये मानसिक धक्का बसला़ त्यामुळे ते घरात विचित्र वागू लागले़ त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले़ त्यांच्यावर मानसोउपचार तज्ञांकडून उपचार सुरु असताना कुटुंबातील सदस्यांनी कपाटातील त्याचे बँक पास पाहिले़ त्यातील उलाढाल पाहून त्यांना धक्का बसला़ मार्च २०१७ मध्ये विलास कामठे यांनी सेवानिवृत्ती घेतली़ सेवानिवृत्तीचे मिळालेले पैसे व त्याअगोदर त्यांच्या बँक खात्यात मोठ्या रक्कमा ट्रान्सफर केल्याचे दिसून आले़ त्याची अधिक माहिती घेतल्यावर त्या सुनिल याच्या नावावर ट्रान्सफर झाल्याचे लक्षात आले़ त्यातून हा प्रकार  उघडकीस आला़ त्यानंतर त्यांचा मुलगा समीर कामठे यांनी पोलिसांत धाव घेतली़ 

टॅग्स :Crimeगुन्हाPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्र