शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
4
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
5
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
6
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
7
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
8
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
9
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
10
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
11
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
13
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
14
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
15
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
16
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
17
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
18
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
19
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
20
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
Daily Top 2Weekly Top 5

फुटबॉलसाठी त्याने सोडले घर !

By admin | Updated: June 20, 2015 00:26 IST

बारावीत नापास झाल्याने घर सोडून पळालेल्या एका विद्यार्थ्याचा शोध घेण्यात गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. त्याला फुटबॉलची आवड होती

नवी मुंबई : बारावीत नापास झाल्याने घर सोडून पळालेल्या एका विद्यार्थ्याचा शोध घेण्यात गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. त्याला फुटबॉलची आवड होती आणि वडिलांनी मात्र शिक्षणासाठी आग्रह धरला होता. त्यामुळे फुटबॉलमध्ये नाव कमवून दाखवण्याच्या जिद्दीने त्याने घर सोडले होते.कळंबोली येथे राहणारा १९ वर्षीय मुलगा हरवल्याची तक्रार कळंबोली पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. त्यानुसार गुन्हे शाखा उपआयुक्त सुरेश मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पुष्पलता दिघे त्याचा शोध घेत होत्या. हरवलेल्या व बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यासाठी त्यांचे विशेष पथक गेल्या काही महिन्यांपासून कार्यरत करण्यात आले आहे. या प्रकरणाची चौकशी करत असताना बारावीत नापास झाल्याने तो घर सोडून गेल्याचे समोर आले. तसेच फुटबॉलची आवड असतानाही वडील केवळ शिक्षणाची सक्ती लादत असल्याचेही पोलिसांसमोर आले. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांना सोशल मीडियाचाही वापर करत त्याच्या मित्रांचीही चौकशी करावी लागली. अखेर तो पुणे मगरपट्टा येथे पिझा हट्टमध्ये नोकरीला असल्याचे पोलिसांना समजले. यानुसार पोलिसांनी २८ दिवसांनी त्याचा शोध घेवून कुटुंबीयांच्या ताब्यात दिले. यावेळी त्याने फुटबॉल खेळात नाव कमवण्याच्या जिद्दीने घर सोडल्याचे पोलिसांना सांगितले. विशेष म्हणजे त्याने पुण्यातील नेहरू स्टेडिअममध्ये फुटबॉल प्रशिक्षणासाठी बोलणी देखील केली होती. तर प्रशिक्षणाचे शुल्क भरण्यासाठी त्याने पिझा हट्टमध्ये ९ हजार रुपये महिना पगाराची नोकरी स्वीकारली होती. (प्रतिनिधी)महाविद्यालयात असतानाही तो फुटबॉलचाही छंद जोपासत होता. अनेकदा फुटबॉल संघातून खेळण्याची संधीही मिळत होती. मात्र घरातून विरोध असतानाही छंद जोपासल्याने व नापास झाल्याने वडील ओरडतील याची त्याला भीती होती. त्यामुळे आॅनलाइन निकाल पाहिल्यानंतर तो घर सोडून गेला होता. घर सोडल्यानंतरही त्याने जिद्द न सोडता फुटबॉलचे प्रशिक्षण सुरूच ठेवले होते. त्याच्या या जिद्दीला पोलिसांनीही सलाम ठोकला आहे.