‘तो’ फ्लॅट माजी पोलीस आयुक्त सत्यपाल यांचा

By Admin | Updated: June 3, 2014 01:05 IST2014-06-03T01:05:43+5:302014-06-03T01:05:43+5:30

समाजसेवा शाखेने अंधेरी (प.) येथील उच्चभ्रू वस्तीमधील सोसायटीत छापा टाकलेल्या फ्लॅटचे मालक मुंबईचे माजी पोलीस आयुक्त व खासदार सत्यपाल सिंह असल्याचे स्पष्ट झाले आहे.

'He' of flat former police commissioner Satyapal | ‘तो’ फ्लॅट माजी पोलीस आयुक्त सत्यपाल यांचा

‘तो’ फ्लॅट माजी पोलीस आयुक्त सत्यपाल यांचा

>मुंबई : समाजसेवा शाखेने अंधेरी (प.) येथील उच्चभ्रू वस्तीमधील सोसायटीत छापा टाकलेल्या फ्लॅटचे मालक मुंबईचे माजी पोलीस आयुक्त व खासदार सत्यपाल सिंह असल्याचे स्पष्ट झाले आहे. अनेक वर्षापूर्वी त्यांनी तो एका खासगी कंपनीला भाडेतत्त्वावर दिला आहे. आपण त्या ठिकाणी अनेक वर्षे फिरकलेलो नाही, त्यामुळे त्या ठिकाणी गैरव्यवहार होत असल्यास त्याची जबाबदारी संबंधित भाडेकरू व सोसायटीच्या व्यवस्थापनाकडे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
वर्सोव्यातील चार बंगल्याजवळील वरिष्ठ शासकीय अधिका:यांचे निवासस्थान असलेल्या पाटलीपुत्र सोसायटीमधील आलिशान फ्लॅटवर शनिवारी  समाजसेवा शाखेच्या पथकाने छापा टाकून वेश्याव्यवसाय करीत असल्याच्या संशयावरून दोघा तरुणींसह तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून रोख रक्कम व निरोधाचे पाकीट सापडले होते. विशेष म्हणजे या वर्षाच्या सुरुवातीला याच सोसायटीतील अन्य एका फ्लॅटमध्ये दोन लाख ईल सीडीज मिळाल्या होत्या. सोसायटीच्या ए-विंगमधील 1क्क्2 नंबरच्या फ्लॅटवर छापा टाकला. त्या ठिकाणी विशीतील दोन तरुणी व एक तरुण आढळून आले. त्या ठिकाणची कागदपत्रे व अन्य साहित्य जप्त केले असून त्यामध्ये सत्यपाल सिंग यांच्या नावाने लाइट बिल मिळाले आहे. त्याबाबत सुरुवातीला पोलीस आयुक्तांचे प्रवक्ते महेश पाटील यांनी फ्लॅटच्या मालकाबाबत स्पष्टीकरण देण्याचे टाळले होते. मात्र चौकशीमध्ये जानेवारी महिन्यात आयुक्तपदाचा राजीनामा देऊन राजकारणात उडी घेतलेल्या सत्यपाल सिंग यांचा हा फ्लॅट असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांनी तो काही वर्षापूर्वी एका खासगी कंपनीला भाडेतत्त्वावर दिला आहे. (प्रतिनिधी) 
 
आपला या प्रकरणाशी काहीही संबंध नसून त्याबद्दल आपणाला काहीही माहिती नव्हते, अन्यथा आपण भाडेकरार रद्द केला असता, असे खासदार सत्यपाल सिंग यांनी म्हटले आहे.  

Web Title: 'He' of flat former police commissioner Satyapal