...पण त्याच्या नजरेतून तो सुटला नाही!
By Admin | Updated: July 31, 2016 04:41 IST2016-07-31T04:40:57+5:302016-07-31T04:41:15+5:30
पोलीस भरतीत डमी उमेदवार बसवून नोकरी मिळविल्याचा प्रताप विक्रोळीत उघडकीस आला.

...पण त्याच्या नजरेतून तो सुटला नाही!
मुंबई : पोलीस भरतीत डमी उमेदवार बसवून नोकरी मिळविल्याचा प्रताप विक्रोळीत उघडकीस आला. अन्य एका उमेदवाराच्या सतर्कतेमुळे त्याचे बिंग फुटले. संदीप जाधव असे आरोपी पोलिसाचे नाव असून चौकशीअंती त्याने डमी बसवून नोकरी मिळविल्याचे तपासात निष्पन्न झाले. याप्रकरणी विक्रोळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एप्रिल - मे महिन्यात मुंबई पोलीस दलातील शिपाईपदांसाठी भरती प्रक्रिया पार पडली. या भरती प्रक्रियेत घणसोलीला राहणाऱ्या संदीप जाधवने परिक्षेत भाग घेतला होता. या परिक्षेच्या मैदानी चाचणीत जाधवने डमी बसवून उत्तीर्ण झाला. . मात्र त्याच्यासह पोलीस होण्याचे स्वप्न उराशी बाळगून आलेल्या अन्य २१ वर्षीय उमेदवाराच्या नजरेतून तो सुटला नाही. मुळात आपल्या पुढे असलेल्या उमेदवार दिसला नाही आणि तो पास कसा झाला?, त्यामुळे त्याने पोलीस भरती प्रक्रियेच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार दिली. चौकशीअंती जाधव दोषी आढळला. भरती प्रक्रियेदरम्यान केलेल्या व्हिडीओमध्ये जाधव उपस्थित नसल्याचे आढळले. त्यानुसार विक्रोळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी कांजुर पोलीस अधिक तपास करत असल्याची माहिती विक्रोळी पोलीस ठाण्याचे वरीष्ठ निरीक्षक श्रीधर हंचाटे यांनी दिली. (प्रतिनिधी)