पत्नी माहेरी गेल्याच्या संतापात त्याने केली आत्महत्या
By Admin | Updated: August 4, 2016 18:21 IST2016-08-04T18:21:18+5:302016-08-04T18:21:18+5:30
पत्नी माहेरी गेल्याने पतीने संतापात आणि नैराश्येतून गळफास घेतल्याची घटना नंदुरबार येथे घडली.

पत्नी माहेरी गेल्याच्या संतापात त्याने केली आत्महत्या
ऑनलाइन लोकमत
नंदुरबार. दि. ४ : पत्नी माहेरी गेल्याने पतीने संतापात आणि नैराश्येतून गळफास घेतल्याची घटना कोपर्ली, ता.नंदुरबार येथे घडली. पोलीस सूत्रांनुसार, कोपर्ली येथील आसाराम महादू भिल (२२) याची पत्नी रागाच्या भरात माहेरी निघून गेली होती. त्यामुळे तो नैराश्येत राहत होता. त्याच नैराश्येतून त्याने गावालगत असलेल्या अमळथे शिवारातील शेताच्या खाईत झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. याबाबत दगडू सखाराम कोळी यांनी तालुका पोलिसांना खबर दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास जमादार कुलकर्णी करीत आहे.