हजरत पीर करीम बाबा दर्ग्याचा उरूस उत्साहात

By Admin | Updated: June 9, 2016 04:24 IST2016-06-09T04:24:37+5:302016-06-09T04:24:37+5:30

आनंद पार्क येथील हजरत पीर करीम शाह बाबा आणि हजरत पीर रहिम शाह बाबा दर्ग्याचा उरुस मोठया उत्साहात पार पडला

Hazrat pir kareem baba dargah urus enthusiasm | हजरत पीर करीम बाबा दर्ग्याचा उरूस उत्साहात

हजरत पीर करीम बाबा दर्ग्याचा उरूस उत्साहात


ठाणे : आनंद पार्क येथील हजरत पीर करीम शाह बाबा आणि हजरत पीर रहिम शाह बाबा दर्ग्याचा उरुस मोठया उत्साहात पार पडला. प्रथेप्रमाणे बाबांच्या समाधीचे पूजन, चंदन लेपन, नवीन कपडयांची अणि फुलांची चादर चढवून हिंदू मुस्लिम बांधवांनी या उत्सवात सहभाग घेतला.
६ जून रोजी पहाटे बाबांच्या समाधीचे पूजन झाल्यानंतर सायंकाळी ६ वाजता आनंदपार्कमधून संदल निघून सर्वधर्मिय बांधवांच्या उपस्थितीत संदलामध्ये कुराणाखाणी, ढोलीबाज्या, रथ संपूर्ण राबोडीतून फिरुन श्रीरंगमार्गे पुन्हा आनंद पार्क येथे आला.
संदल परत समाधीस्थळी आल्यानंतर प्रार्थना झाल्यावर सर्व भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
याप्रसंगी शिवसेना उपनेते अनंत तरे, स्थानिक नगरसेविका महेश्वरी तरे, माजी नगरसेवक संजय तरे, बशीर बापे, डॉ. जस्मीन राजके, अब्दुल शेख, शबास शेख, शोएब काजी, शाळीग्राम ठाणेकर अजित ठाणेकर, योगेश कोळी, सुनिल भोईर, दिलीप जयसिंगपुरे, शंकर नाईक, अप्पा कुलकर्णी, किशोर भोईर,शमशीर शेख, रियाज शेख, राजा शेख, शकील शेख, परवेज शेख, नुरजहा शेख, सम्मो खान, फरा शेख, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Hazrat pir kareem baba dargah urus enthusiasm