अण्णा हजारे यांना धमकीचे पत्र

By Admin | Updated: January 17, 2016 02:32 IST2016-01-17T02:32:42+5:302016-01-17T02:32:42+5:30

तुम्ही तुमचा वारसदार ठरवा, अन्यथा तुम्हाला ठार मारू, अशा आशयाचे धमकीचे पत्र ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना नेवासा तालुक्यातून आले आहे. त्यात नेवासा

Hazare letter to Anna Hazare | अण्णा हजारे यांना धमकीचे पत्र

अण्णा हजारे यांना धमकीचे पत्र

पारनेर (अहमदनगर) : तुम्ही तुमचा वारसदार ठरवा, अन्यथा तुम्हाला ठार मारू, अशा आशयाचे धमकीचे पत्र ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना नेवासा तालुक्यातून आले आहे. त्यात नेवासा तालुक्यातील तिघांची नावे व दूरध्वनी क्रमांक आहेत. पारनेर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
अण्णांच्या कार्यालयात चार ते पाच दिवसांपूर्वी पत्र आले असून त्यात हजारे यांचा शेवटचा दिवस २६ जानेवारी असून ‘तुमचा आम्ही गेम करणार आहे. तुमचे वारसदार, मालमत्तेचे लवकर वितरण करा,’ असे म्हटले आहे. पत्रात नेवासा तालुक्यातील अंबादास चिमा लष्करे, निलेश ज्ञानेश्वर पोहेकर, पप्पू पवार, पांडे मिस्तरी, अमोल या नावाचा उल्लेख आहे.
शाम पठाडे, अमोल झेंडे यांनी पारनेर पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिलीप पारेकर यांना पत्राची माहिती दिली. सोशल मीडियावर त्याची शनिवारी दिवसभर चर्चा झाल्याने अण्णांच्या कार्यालयाने पत्राबाबत पत्रकारांना माहिती दिली. अण्णांना यापूर्वीही धमकीची पत्रे आली आहेत. त्याच्या तपासात दुसऱ्यांच्या नावावर पत्रे पाठविल्याचे उघड झाले.

Web Title: Hazare letter to Anna Hazare