शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

निवडणुकीत ठाकरेंची 'मशाल' हाती न घेण्यामागचं कारण काय?; राजू शेट्टींचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2024 18:04 IST

Loksabha Election 2024: हातकणंगले मतदारसंघातील निवडणुकीवरून उद्धव ठाकरे आणि राजू शेट्टी यांच्यातील चर्चा फिस्कटली. त्यामुळे आता या मतदारसंघात सत्यजित पाटील यांना ठाकरेंकडून उमेदवारी देण्यात आली आहे. 

कोल्हापूर - Raju Shetty on Uddhav Thackeray ( Marathi News ) महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाने हातकणंगले मतदारसंघात उमेदवार दिला आहे. राजू शेट्टी यांच्याशी सुरू असलेली ठाकरे गटाची बोलणी फिस्कटली. शेट्टींनी उद्धव ठाकरे गटाच्या मशाल चिन्हावर लढण्यास असमर्थता दाखवली त्यामुळे आता या जागेवर ठाकरेंकडून सत्यजित पाटील यांना रिंगणात उतरवलं आहे. वैयक्तिक फायद्यासाठी मशाल चिन्हावर लढणार नाही असं सांगत राजू शेट्टींनी आता ही निवडणूक जनतेनं हाती घ्यावी असं आवाहन केले आहे.

राजू शेट्टी म्हणाले की, स्वाभिमान शेतकरी संघटना महायुतीतून बाहेर पडली होती. त्याचं कारण म्हणजे तीन तुकड्यांमधील एफआरपी, भूमिअधिग्रहण कायद्यात दुरुस्तीबाबत जो काही निर्णय झाला त्याला धोरणात्मक विरोध म्हणून आम्ही महायुतीतून बाहेर पडलो. त्यानंतर स्वतंत्र निवडणूक लढवण्याची तयारी सुरू होती. गेल्या ३ वर्षापासून आम्ही तयारी करतोय. त्या मधल्या काळात भाजपाचा पराभव करण्यासाठी महाविकास आघाडीचा पाठिंबा घ्यावा अशी मागणी पुढे आली. हातकणंगलेमध्ये उमेदवार देणार नाही अशी भूमिका मविआच्या नेत्यांची घेतली होती असं त्यांनी सांगितले. 

त्याचसोबत जर तिथे मविआनं उमेदवार दिला नाही तर भाजपाविरोधी मतांची विभागणी होणार नाही या भूमिकेतून मी दोनदा उद्धव ठाकरेंची भेट घेतली. त्यांनीही सकारात्मक भूमिका घेतली. परंतु नंतर अचानक काय झालं माहिती नाही. २ दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंकडून निरोप आला तुम्ही मशाल चिन्हावर लढलं पाहिजे. मशाल चिन्ह शिवसेना ठाकरे गटाला मिळालंय. मी त्या चिन्हावर लढणं याचा अर्थ मी शिवसेनेत प्रवेश केल्यासारखं आहे. गेली ३० वर्ष मी शेतकरी चळवळीत काम करतोय. मी माझ्या आयुष्यात कुठल्याही राजकीय पक्षात काम केले नाही. निवडणूक लढवायला सोपे जावे यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची स्थापना केली. त्यात माझ्या वैयक्तिक फायद्यासाठी शेतकऱ्यांना आणि संघटनेला वाऱ्यावर सोडून मी ही निवडणूक लढवू शकत नाही. त्यामुळे मी मशाल चिन्ह घेणार नाही असं कळवलं असा खुलासा राजू शेट्टी यांनी केला. 

दरम्यान,  हातकणंगलेतून त्यांनी उमेदवार जाहीर केला आहे. हा त्यांचा अधिकार आहे. खऱ्या अर्थाने गोरगरिब, शेतकऱ्यांचा, मजुरांचा आवाज संसदेत पोहचवण्याची जबाबदारी ही गावकऱ्यांनी घेतली पाहिजे. ही निवडणूक लोकांनी हातात घ्यावी. ही निवडणूक लढवू आणि जिंकूही अशी मला खात्री आहे असा विश्वास राजू शेट्टी यांनी व्यक्त केला. त्यामुळे हातकणंगले मतदारसंघात ध्यैर्यशील माने, राजू शेट्टी आणि सत्यजित पाटील यांच्यात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :hatkanangle-pcहातकणंगलेRaju Shettyराजू शेट्टीUddhav Thackerayउद्धव ठाकरेlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४