Hassan's Nagraj is on a cycle all over the country; Every state is going to meet the Chief Minister! | हासनचा नागराज देशभर सायकलवर फिरतोय; प्रत्येक राज्यात जाऊन मुख्यमंत्र्यांना भेटतोय !
हासनचा नागराज देशभर सायकलवर फिरतोय; प्रत्येक राज्यात जाऊन मुख्यमंत्र्यांना भेटतोय !

ठळक मुद्देसमता, बंधुत्व, देशप्रेम रुजवण्यासाठी कर्नाटकी नागराज गौडा हा सायकलवरून देशाची सफर करतोयगेल्या दीड वर्षापासून तो १५ राज्यातील भ्रमंती पूर्ण करून त्यानं सोमवारी सोलापूर गाठलंया भ्रमंती सफरीत त्यानं अनेक राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधत देशात एकता, अखंडता, शांती नांदावी यासाठी प्रयत्न करीत

आप्पासाहेब पाटील

सोलापूर : जगात जिथं लोकशाही बळकट आहे... ती अधिक बळकट करण्यासाठी अर्थात अखंड भारतातील प्रत्येकामध्ये समता, बंधुत्व, देशप्रेम रुजवण्यासाठी कर्नाटकी नागराज गौडा हा सायकलवरून देशाची सफर करतोय. गेल्या दीड वर्षापासून तो १५ राज्यातील भ्रमंती पूर्ण करून त्यानं सोमवारी सोलापूर गाठलं.. या भ्रमंती सफरीत त्यानं अनेक राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधत देशात एकता, अखंडता, शांती नांदावी यासाठी प्रयत्न करीत असल्याचे सांगितल्याची माहिती नागराज गौडा याने ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले. ना लग्नाची चिंता ना घरची... केवळ मनी विचार अखंड भारताचे आले म्हणून हा अवलिया सध्या सायकलवरुन देशाची भ्रमंती करत आहे. 

या जगात कोण कशासाठी काय करेल हे सांगणे थोडं कठीणच आहे़ आतापर्यंत देशातील अनेक अवलियांनी विविध कारणासाठी वाट्टेल ते केल्याचे आपण जाणताच मात्र देशभक्तीसाठी दीड वर्षात १५ राज्यांची भ्रमंती करणाºया अवलियाने सोमवारी सोलापूर गाठलं.. कर्नाटक राज्यातील हासन येथील नागराज मल्ले गौडा असं त्याचं नाव़ याबाबत नागराज याच्याशी संवाद साधला असता तो म्हणाला की, माझे मूळगाव हासन आहे़ मी अविवाहित असून माझी घरची परिस्थिती सर्वसाधारण आहे़ माझे हासन येथे किराणा दुकान असून घरचे उर्वरित लोक हे दुकान चालवितात़ सुरुवातीपासून मला देशाबद्दल प्रेम, सर्वसामान्यांबाबत आपुलकी, गरीब, वंचित, गरजू लोकांची मदत करण्याची आवड होती. शालेय शिक्षण झाल्यानंतर देशासाठी काहीतरी करावं या उद्देशाने मी सायकल भ्रमंतीचा निर्णय घेतला़ त्यानुसार डिसेंबर २०१७ साली या भ्रमंतीला सुरुवात केली़ मुंबई येथील अंधेरी पूर्व येथून सायकल सफर सुरू केल्यानंतर दीड वर्षात १५ राज्यांचा दौरा केला़ या दौºयात देशातील अनेक सिनेस्टार कलावंत, राजकीय मंडळी, सामाजिक क्षेत्रात काम करणारे समाजसेवक आदींची भेट घेतली़ या भेटीदरम्यान फक्त देशाच्या विविध विषयावर चर्चा केल्याचं त्या नागराजने सांगितले़

या राज्याचा केला दौरा पूर्ण
- कर्नाटकच्या नागराज गौडा या अवलियाने आतापर्यंत दीड वर्षात  दिल्ली, महाराष्ट्र, राजस्थान, हरियाणा, गुजरात, पंजाब, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, तामिळनाडू आदी १५ राज्यांची सफर पूर्ण केली आहे़ ज्या ज्या राज्यात प्रवेश केला तेथे देशप्रेमाबद्दलचा प्रचार, प्रसार व जनजागृती केली़ राज्याराज्यातील विविध सेवाभावी संस्था, संघटना, लोकप्रतिनिधींशी संवाद साधत देशप्रेम जागृत करण्याचे काम केल्याचे गौडा याने सांगितले़

या लोकांच्या घेतल्या गाठीभेटी
- १५ राज्यांचा दौरा करीत असताना नागराज गौडा याने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, शीला दीक्षित, दिग्विजय सिंह, राजस्थानचे अशोक गेहलोत, उत्तर प्रदेशचे अखिलेश यादव, मध्य प्रदेशचे कमलनाथ, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिध्दरामय्या, मध्यप्रदेशचे ज्योतिरादित्य शिंदे, दिल्लीचे मनोज तिवारी आदी मुख्यमंत्र्यांसह विविध पक्षांचे लोकप्रतिनिधी, समाजसेवक व मंदिराच्या प्रमुखांची भेट घेतल्याचे सांगितले़ 

जगात शांती नांदावी, देश सुरक्षित राहावा या उद्देशाने सायकल भ्रमंती सुरू केली आहे़ आतापर्यंत देशातील १५ राज्यांचा दौरा पूर्ण केला असून, संपूर्ण देशाची भ्रमंती करणार आहे़ सध्या पंढरपूरची आषाढी वारी असल्याची माहिती मिळाल्याने पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी आलो आहे़ मंगळवारी विठ्ठलाचे दर्शन घेऊन गुजरात राज्याच्या दिशेने सायकल प्रवास सुरू ठेवणार आहे़
- नागराज मल्ले गौडा,
सायकल भ्रमंती अवलिया, हासन (कर्नाटक)


Web Title: Hassan's Nagraj is on a cycle all over the country; Every state is going to meet the Chief Minister!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.