शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
3
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
4
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
5
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
6
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
7
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
8
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
9
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
10
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
11
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
12
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
13
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
14
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
15
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
16
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
17
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
18
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
19
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
20
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

“छगन भुजबळांनी जितेंद्र आव्हाडांना खडेबोल सुनावले हवे होते पण...”; हसन मुश्रीफ यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2024 13:05 IST

Hasan Mushrif News: जितेंद्र आव्हाड प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे दोन मंत्री आमनेसामने आल्याचे पाहायला मिळत आहे.

Hasan Mushrif News: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृतीचे दहन करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोडो फाडला. मात्र, चूक लक्षात येताच जितेंद्र आव्हाडांनी माफी मागितली. असे असले तरी विरोधकांनी जितेंद्र आव्हाडांवर जोरदार शब्दांत हल्लाबोल सुरूच ठेवला असून, छगन भुजबळ यांनी जितेंद्र आव्हाड यांची पाठराखण केली म्हणून हसन मुश्रीफ यांनी टीकास्त्र सोडले आहे. 

विरोधकांनी सडकून टीका सुरू केल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांची बाजू घेण्यासाठी छगन भुजबळ पुढे सरसावले. जितेंद्र आव्हाड एका चांगल्या भावनेने महाडला गेले. मनुस्मृती जाळली पाहिजे ही त्यांची भावना चांगली होती. त्याबद्दल कुणाच्याही मनात शंका नाही. त्यावेळी त्यांनी न बघताच ते चित्र फाडले. आव्हाडांनंतर त्यांचे अनुकरण इतरांनी केले. पण त्यांनी माफीही मागितली. मूळ मुद्दा जो आहे आम्हाला मनुस्मृतीचा चंचू प्रवेश नको हे बाजूला होईल आणि फक्त जितेंद्र आव्हाड जितेंद्र आव्हाड असेच सुरू राहील, असे छगन भुजबळ यांनी म्हटले होते. मात्र, यावरून हसन मुश्रीफ यांनी नाराजी व्यक्त करत भुजबळांवर निशाणा साधला.

छगन भुजबळांनी जितेंद्र आव्हाडांना खडेबोल सुनावले पाहिजे होते

छगन भुजबळ यांनी जितेंद्र आव्हाड याांची पाठराखण केल्याने अजितदादा गटाचेच मंत्री हसन मुश्रीफ यांनी छगन भुजबळांवर टीका केली. त्यामुळे आता हसन मुश्रीफ आणि छगन भुजबळ यांच्यातच जुंपल्याचे पाहायला मिळत आहे. जितेंद्र आव्हाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेले पत्रक फाडले हे निंदनीय आहेच. पण आमच्या छगन भुजबळ यांनी जितेंद्र आव्हाड यांची बाजू घेतली. मनुस्मृतीचा मुद्दा कुठे तरी बाजूला पडेल म्हणून जितेंद्र आव्हाड यांना पाठिंबा देण्याचे विधान छगन भुजबळ यांनी केले, हे अत्यंत दुर्दैवी आहे. छगन भुजबळांनी जितेंद्र आव्हाडांना खडेबोल सुनावले पाहिजे होते. त्यांची कृती ही अत्यंत चुकीची आहे. याबाबत त्यांनी बोलायला हवे होते, या शब्दांत हसन मुश्रीफ यांनी छगन भुजबळ यांचा समाचार घेतला आहे.

दरम्यान, जितेंद्र आव्हाडांना विरोधासाठी विरोध करु नका.  मुख्य मुद्दा मनुस्मृतीचा शालेय अभ्यासक्रमात प्रवेश होता कामा नये हा आहे. त्याचा निषेध करा, त्याचा विरोध करा. पहिल्यांदा शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृती नको हे सांगा. नंतर जितेंद्र आव्हाड यांचा निषेध करा. आव्हाड विरोधक आहेत त्यांचा विरोध निश्चितच करा, आमचे काही म्हणणे नाही. मुंबईतून ते चवदार तळ्यावर गेले होते त्यांच्याहातून चुकून झाले. आता त्यांना शिक्षा काय करायची ती करा माझं काही म्हणणे नाही. मी समता परिषदेचा फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांचा पाईक आहे. मी अशा गोष्टींमध्ये स्पष्ट बोलतो. खोटे बोलणे मला जमत नाही. विरोधासाठी विरोध मी करु शकत नाही, असे छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले. 

टॅग्स :Hasan Mushrifहसन मुश्रीफChhagan Bhujbalछगन भुजबळJitendra Awhadजितेंद्र आव्हाडNCPराष्ट्रवादी काँग्रेस