हार्दिक पटेल आज शिवसेनेच्या मंचावर

By Admin | Updated: February 7, 2017 05:41 IST2017-02-07T05:41:53+5:302017-02-07T05:41:53+5:30

गुजरातमधील धडाडीचे युवा नेते हार्दिक पटेल उद्या (७ फेब्रुवारी) शिवसेनेच्या जाहीर सभेत सहभागी होणार आहेत.

Hardik Patel today is on Shiv Sena's stage | हार्दिक पटेल आज शिवसेनेच्या मंचावर

हार्दिक पटेल आज शिवसेनेच्या मंचावर

मुंबई : गुजरातमधील धडाडीचे युवा नेते हार्दिक पटेल उद्या (७ फेब्रुवारी) शिवसेनेच्या जाहीर सभेत सहभागी होणार आहेत. सायंकाळी ७ वाजता गोरेगाव (प.) रेल्वे स्टेशनजवळील स्टर्लिंग हॉलमध्ये होणाऱ्या या जाहीर सभेत राज्याचे उद्योगमंत्री आणि शिवसेना नेते सुभाष देसाई व प्रभाग क्रमांक ५५चे शिवसेना उमेदवार बिरेन लिंबाचिया उपस्थित राहणार आहेत.
शिवसेनेने पालिका निवडणुकीत ६ गुजराती समाजाचे उमेदवार देऊन भाजपावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात आता गुजराती मतांसाठी मोठी फिल्डिंग शिवसेना लावत असल्याचेच स्पष्ट होत आहे. या जाहीर सभेसाठी शिवसेनेने गेल्या काही दिवसांपासून जोरदार तयारी केली असून, गुजराती मतदारांना आकर्षित करण्यासाठी पुढील सभांमध्येही गुजराती नेते आणि कलाकारांना आमंत्रित केले जाण्याची शक्यता आहे.

Web Title: Hardik Patel today is on Shiv Sena's stage