हार्बर रेल्वे विस्कळीत, प्रवाशांचे प्रचंड हाल

By Admin | Updated: June 1, 2016 19:27 IST2016-06-01T18:56:40+5:302016-06-01T19:27:44+5:30

वडाळा ते सीएसटी दरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यानं हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे.

Harbor Route disrupted, huge crowd of passengers | हार्बर रेल्वे विस्कळीत, प्रवाशांचे प्रचंड हाल

हार्बर रेल्वे विस्कळीत, प्रवाशांचे प्रचंड हाल

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 1-  मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे पाठोपाठ आता हार्बर रेल्वेचाही बो-या वाजला आहे. हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.

वडाळा ते सीएसटी दरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यानं हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. वडाळ्याहून सीएसटीकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. ऐन ऑफिस सुटण्याच्या वेळी वाहतूक रेल्वे विस्कळीत झाल्यानं प्रवाशांना भयंकर त्रासाला सामोरं जावं लागतं आहे. तर, कुर्ल्याहून वाशीच्या दिशेने जाणा-या गाड्या धिम्या गतीनं सुरू आहेत. तर सीएसटीकडे जाणा-या गाड्या खोळंबल्यानं प्रवाशांना नाहक त्रास होत आहे.  

Web Title: Harbor Route disrupted, huge crowd of passengers