अनैतिक संबंधाला हरकत घेणा-या विवाहितेचा छळ
By Admin | Updated: September 11, 2016 19:48 IST2016-09-11T19:48:33+5:302016-09-11T19:48:33+5:30
पतीचे एका तरुणीशी असलेल्या अनैतिक संबंधाला हरकत घेणा:या विवाहितेचाच छळ केल्याची घटना तुळशीधाम भागात घडली

अनैतिक संबंधाला हरकत घेणा-या विवाहितेचा छळ
ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. ११ : पतीचे एका तरुणीशी असलेल्या अनैतिक संबंधाला हरकत घेणा:या विवाहितेचाच छळ केल्याची घटना तुळशीधाम भागात घडली. याप्रकरणी विवाहित महिलेने कापूरबावडी पोलीस ठाण्यास पतीसह सासरच्या मंडळींविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
गुरुशरण सिंग आणि मनज्योत कौर यांचा विवाह दीड वर्षापूर्वी झाला आहे. लग्नात मनज्योतच्या वडिलांनी तिला दागिने आणि एक लाखांची रोकड दिली होती. ही रक्कम गुरुशरणने परत न करता अपहार केला. शिवाय, माहेरुन आणखी पाच लाख रुपये आणावेत, यासाठी तिचा छळ सुरु केला. त्यातच त्यांच्या घराशेजारी राहणा:या एका तरुणीशी त्याचे अनैतिक संबंध असल्याचीही माहिती तिला मिळाली.
या प्रकारालाही तिने कडाडून विरोध केल्यानंतर घरात पतीसह सासू सुखवंत कौर आणि सासरे कश्मीर सिंग यांनी आपसात संगनमत करून तिचा आणखी छळ सुरू केला. हा प्रकार 16 फेब्रुवारी 2015 ते 10 सप्टेंबर 2016 र्पयत सुरुच होता. सततच्या या छळाला कंटाळून तिने अखेर याप्रकरणी 10 सप्टेंबर रोजी कापूरबावडी पोलीस ठाण्यात पतीसह तिघांविरुद्ध तक्रार दाखल केली. याप्रकरणी चौकशी सुरु असल्यामुळे कोणालाही अद्याप अटक केली नसल्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश जाधव यांनी सांगितले