अडतीच्य मुदयावरुन शेतकरी संघटनेची तोडफोड
By Admin | Updated: July 17, 2016 18:27 IST2016-07-17T18:27:11+5:302016-07-17T18:27:11+5:30
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने नाशिक मधील पिंपळगांवात आंदोलन करण्यात आले. अंधोलनात अड़तीच्य मुद्द्यावरुन व्यापारी असोशिएशनचे कार्यालय फोडले

अडतीच्य मुदयावरुन शेतकरी संघटनेची तोडफोड
>ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. १७ : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने नाशिक मधील पिंपळगांवात आंदोलन करण्यात आले. अंधोलनात अड़तीच्य मुद्द्यावरुन व्यापारी असोशिएशनचे कार्यालय फोडले. यावेळी युवा प्रदेशाध्यक्ष हंसराज वडघुले, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दीपक पगार, उपाध्यक्ष साहेबराव मोरे, महानगर प्रमुख नितिन रोठे पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
गेल्या 2 दिवसापासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे वाटाघाटी करण्याचे प्रयत्न सुरु होते मात्र मुजोर व्यापारी बैठक घ्यायला तयार नव्हते अखेर संतापाचा उद्रेक झाला आणि कार्यालय फोडत प्रतीकात्मक पुतळा जाळला.
नही चलेगी दादागिरी नही चलेगी,व्यापारी असोशिएशन मुर्दाबाद,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विजय असो अशा घोषणा झाल्या.
यावेळी वडघुले म्हणाले की व्यापाऱ्यांनी परवाने जरी परत केले असले तरी तरी गाळे,खळे,मार्केट फीत्यांनी परत करावी अशी मागणी आम्ही करत आहोत.
दरम्यान व्यापाऱ्यांनी साठवण केलेला माल मार्केट मध्ये जमा आहे जीवनावषयक वस्तु साठवु शकत नाही मात्र व्यापारी उल्लंघन करत आहेत मात्र त्यांची एकही मालवाहतूक गाड़ी बाहेर पडू देणार नाहीअसा इशारा दिला आहे