महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वाढदिवसानिमित्त राज्याभरातून शुभेच्छा दिल्या जात आहेत. मात्र, राज्याचे कृषी मंत्री आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते माणिकराव कोकाटे यांनी अजित पवारांना दिलेल्या अनोख्या शुभेच्छाची वेगळीच चर्चा रंगली. कोकाटे यांनी आपल्या मतदारसंघात तब्बल ११ एकर शेतजमिनीवर अजित पवारांचे चित्र रेखाटून त्यांना शुभेच्छा दिल्या, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, ही कलाकृती कलाकार मंगेश निपाणीकर आणि क्षिप्रा मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली इतर कामगार आणि ट्रॅक्टरच्या मदतीने तयार करण्यात आली, यासाठी त्यांना दररोज सहा दिवस १० तास काम करावे लागले, अशीही माहिती आहे.
महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान माणिकराव कोकाटे मोबाईलमध्ये गेम खेळताना कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतर वादात सापडले होते. कोकाटे यांचा हा व्हिडीओ शरद पवार गटातील आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवरून शेअर केला होता. त्यानंतर हा व्हिडीओ वाऱ्यासारखा व्हायरल झाला. महाविकास आघाडीतील नेत्यांसह अनेकांनी कोकाटे यांच्या कृतीवर टीका होत आहे.