असे घडले एफटीआयआयचे आंदोलन
By Admin | Updated: October 29, 2015 00:08 IST2015-10-29T00:08:11+5:302015-10-29T00:08:11+5:30
‘एफटीआयआय’ही कलेचा वारसा जपणारी अत्यंत जुनी आणि प्रतिष्ठित संस्था आहे. या संस्थेच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी गजेंद्र चौहान यांच्यासह इतर सदस्यांची

असे घडले एफटीआयआयचे आंदोलन
पुणे : ‘एफटीआयआय’ही कलेचा वारसा जपणारी अत्यंत जुनी आणि प्रतिष्ठित संस्था आहे. या संस्थेच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी गजेंद्र चौहान यांच्यासह इतर सदस्यांची नियुक्ती केल्याप्रकरणी विद्यार्थ्यांनी तब्बल १३९ व्या दिवसापर्यंत केलेल्या आंदोलनाने देशाचे लक्ष वेधून घेतले. या आंदोलनाचा घेतलेला हा आढावा...
१० जून : फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया (एफटीआयआय) च्या नियामक मंडळाची पुनर्रचना, अध्यक्षपदी गजेंद्र चौहान यांची निवड
१२ जून : एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांचे गजेंद्र चौहान व सदस्यांच्या निवडीविरोधात आंदोलन सुरू
१६ जून : आमदार नीतेश राणे यांनी घेतली विद्यार्थ्यांची भेट
२३ जून : प्रसिद्ध अभिनेते टॉम आॅल्टर यांनी घेतली विद्यार्थ्यांची भेट, चौहान यांच्याशी चर्चा करण्याचा सल्ला.
१ जुलै : विद्यार्थ्यांचा मोर्चा
३ जुलै : एफटीआयआयचे विद्यार्थी आणि माजी विद्यार्थी यांचे पहिले शिष्टमंडळ केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अरुण जेटली यांच्याशी चर्चा करायला दिल्लीला रवाना. विद्यार्थी व सरकार यांच्यातील पहिली बैठक निष्फळ
६ जुलै : प्रसिद्ध दिग्दर्शक जहानू बरूआ व पल्लवी जोशी यांचा नियामक मंडळाच्या सदस्यत्वाचा राजीनामा
७ जुलै : ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी घेतली विद्यार्थ्यांची भेट, मध्यस्थी करण्याची तयारी.
९ जुलै : विद्यार्थ्यांचा कोर्टात जाण्याचा इशारा
१५ जुलै : संचालकांची विद्यार्थ्यांना कारवाईची नोटीस
१७ जुलै : डी. जे. नारायण यांचा संचालकपदाचा कार्यकाळ संपला, प्रशांत पाठराबे संचालकपदी
१७ जुलै : ज्येष्ठ भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी यांनी घेतली विद्यार्थ्यांची भेट
२० जुलै : संस्थेचे कर्मचारी संजय चांदेकर व विद्यार्थी यांच्यात बाचाबाची
२१ जुलै : प्रसिद्ध अभिनेत्री व काँग्रेसच्या प्रवक्त्या नगमा यांनी घेतली विद्यार्थ्यांची भेट
२५ जुलै : एफटीआयआयच्या काही प्रथितयश माजी विद्यार्थ्यांनी वैयक्तिक पातळीवर हा प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न सुरू
३१ जुलै : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी घेतली विद्यार्थ्यांची भेट, विद्यार्थ्यांना पाठिंबा. सरकारवर टीका
३ आॅगस्ट : दिल्ली मार्च संपाला आंदोलनाचे स्वरूप देण्याच्या दृष्टीने देशभर वेगवेगळ्या संस्था, विद्यापीठ, नावाजलेली महाविद्यालये इथे जाऊन बाजू मांडायला सुरुवात. पथनाट्ये, कविता, लेख, कलाकृती, पेंटिंग्ज, शॉर्ट फिल्म्स, कार्टून्स या सर्वांच्या माध्यमातून अभिव्यक्तीचा प्रयत्न. ‘चलो दिल्ली’चा नारा.
६ आॅगस्ट : अध्यक्ष नियुक्ती व आंदोलन दोन्हीही निरर्थक, राज ठाकरे यांची टीका
७ आॅगस्ट : वसतिगृह सोडण्याचे संचालकांचे विद्यार्थ्यांना आदेश
१० आॅगस्ट : संस्था सोडणार नाही, विद्यार्थ्यांची भूमिका
११ आॅगस्ट : कलाकारांच्या सह्यांचे निवेदन मंत्रालयाला
१७ आॅगस्ट : संचालकांना विद्यार्थ्यांचा घेराव
१८ आॅगस्ट : एफआयआर आणि विद्यार्थ्यांना अटक
२१ आॅगस्ट : सरकारतर्फे खान समितीची संस्थेला भेट
३१ आॅगस्ट : ८२ कर्मचाऱ्यांना कामावरून काढले
०१ सप्टेंबर : कर्मचारी कामावर रुजू
०८ सप्टेंबर : प्रसिद्ध निर्माते दिग्दर्शक राजू हिरानी यांचा अध्यक्षपद स्वीकारण्यास नकार
१० सप्टेंबर : विद्यार्थ्यांचे
उपोषण सुरू
१६ सप्टेंबर : ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांनी घेतली विद्यार्थ्यांची भेट, गजेंद्र चौहान यांच्यावर टीका
१९ सप्टेंबर : विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला शंभर दिवस पूर्ण
२२ सप्टेंबर : आंदोलनाला शंभर दिवस उलटून गेल्यानंतरही काहीच तोडगा निघत नसल्याने खान समितीने विद्यार्थी, प्रशासनाला धारेवर धरले.
२३ सप्टेंबर : पल्लवी जोशी यांनी घेतली विद्यार्थ्यांची भेट
२८ सप्टेंबर : विद्यार्थ्यांनी
उपोषण सोडले
२९ सप्टेंबर : विद्यार्थी व सरकार यांच्यातील बैठक निष्फळ
१ आॅक्टोबर : विद्यार्थी व सरकार यांच्यातील बैठक निष्फळ
६ आॅक्टोबर : विद्यार्थी व सरकार यांच्यातील बैठक निष्फळ
१९ आॅक्टोबर : उच्च न्यायालयाची विद्यार्थी, संस्था, राज्य व केंद्र सरकारला नोटीस
२० आॅक्टोबर : माहिती व प्रसारण राज्यमंत्री राजवर्धनसिंह राठोड आणि विद्यार्थी यांच्यातील पाचवी बैठक निष्फळ. गजेंद्र चौहान यांची नियुक्ती मुद्दा महत्त्वपूर्ण नाही, राठोड यांचे वक्तव्य.
२८ आॅक्टोबर : १३९ दिवसांनंतर विद्यार्थ्यांचे आंदोलन मागे.