हंसराज अहीर यांनी जवानांसोबत साजरी केली दिवाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2017 05:01 IST2017-10-21T05:00:13+5:302017-10-21T05:01:08+5:30

केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी गुरूवारी थेट अहेरी गाठून प्राणहिता पोलीस उपमुख्यालयात केंद्रीय राखीव पोलीस बल क्र. ९ च्या अधिकारी आणि जवानांसोबत दिवाळी साजरी केली.

Hansraj Ahir celebrated with the jawans Diwali | हंसराज अहीर यांनी जवानांसोबत साजरी केली दिवाळी

हंसराज अहीर यांनी जवानांसोबत साजरी केली दिवाळी

आलापल्ली : केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी गुरूवारी थेट अहेरी गाठून प्राणहिता पोलीस उपमुख्यालयात केंद्रीय राखीव पोलीस बल क्र. ९ च्या अधिकारी आणि जवानांसोबत दिवाळी साजरी केली. याप्रसंगी त्यांनी जवानांना गोड पदार्थ चारून तसेच त्यांच्यासोबत फटाके फोडून दिवाळीचा आनंद साजरा केला.
गडचिरोली जिल्ह्यातील अतिसंवेदनशील दक्षिण भागाच्या अहेरी येथील प्राणहिता येथील केंद्रीय राखीव पोलीस बल क्र. ९ (बटालियन) आणि अतिरिक्त पोलीस उपमुख्यालयाच्या अधिकारी व जवानांची केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी अचानक भेट घेऊन दिवाळी साजरी केली. नक्षलग्रस्त अहेरी तालुक्यातील प्राणहिता येथे अहीर यांनी स्वत: जवानांना मिठाई चारून त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच शासन स्तरावर जवानांसाठी आणखी काय सुधारणा व सोयीसवलती करुन मनोबल वाढविण्यात येईल, यासाठी केंद्र शासन प्रयत्नशील असल्याचे ना. अहीर म्हणाले.

Web Title: Hansraj Ahir celebrated with the jawans Diwali