शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
4
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
5
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
6
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
7
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
8
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
9
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
10
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
11
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
13
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
14
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
15
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
16
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
17
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
18
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
19
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
20
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना

उद्योगांच्या वीज सबसिडीचा फायदा मूठभर कंपन्यांनाच; १५ उद्योगांनी घेतले ४,०४९ कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2021 7:35 AM

महाविकास आघाडी सरकारने २०२०-२१ मध्ये १,२०० कोटी रुपयांची सबसिडी दिली. त्यातील ७५० कोटी रुपयांचा लाभ या १५ कारखान्यांना झाला. त्यात सर्व स्टील उद्योग आहेत. 

मुंबई : राज्य शासन १,२०० कोटी रुपयांची वीज सबसिडी मराठवाडा, विदर्भ व इतर मागासलेल्या जिल्ह्यांमधील कारखान्यांना देते, पण त्याचा फायदा केवळ १५ उद्योग उचलत असल्याची बाब समोर आली आहे.या भागातील उद्योगांना साडेचार रुपये युनिट दराने वीज देण्याचा निर्णय तत्कालीन फडणवीस सरकारने घेतला होता व त्याची अंमलबजावणीही केली. अन्य जिल्ह्यांमध्ये हा दर आठ रुपये इतका आहे. ही सबसिडी देताना अशा अटी घालण्यात आल्या की, सबसिडीचा फायदा केवळ बड्या उद्योगांनाच होईल व लघू व मध्यम उद्योग वंचित राहतील. एकूण ७,५०० कारखान्यांपैकी १५ कारखान्यांनी ६५ टक्के सबसिडी उचलली, अशी आकडेवारी समोर आली आहे. महाविकास आघाडी सरकारने २०२०-२१ मध्ये १,२०० कोटी रुपयांची सबसिडी दिली. त्यातील ७५० कोटी रुपयांचा लाभ या १५ कारखान्यांना झाला. त्यात सर्व स्टील उद्योग आहेत. वर्धेतील एका कंपनीला १२० कोटी रुपयांची सबसिडी मिळाली. ही बाब समोर आल्यानंतर आता या सबसिडीचा फेरआढावाराज्य शासन घेणार असून राज्याचे उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री अजित पवार यांनी त्याबाबतची माहिती मागविली असल्याचे सूत्रांनी सांगितले.२०१६-१७ पासून आतापर्यंत ६२०० कोटी रुपयांची वीज सबसिडी देण्यात आली. त्यातील तब्बल ४०४९ कोटींची सबसिडी ही केवळ १५ उद्योगांना मिळाली.उद्योगांना वीज सबसिडीचे नवे धोरण आणले जाईल. विशिष्ट उद्योगांना ही सबसिडी मिळण्याऐवजी ती इतरांनाही मिळेल. शिवाय सबसिडीच्या रकमेला मर्यादा टाकण्यात येईल.- नितीन राऊत, ऊर्जामंत्री