लाचखोरांचे हात कापा - गोवा विधानसभेत आमदाराची मागणी
By Admin | Updated: August 2, 2016 13:26 IST2016-08-02T13:25:46+5:302016-08-02T13:26:46+5:30
लाच घेताना रंगेहाथ सापडल्यास अशा लोकांचे हातच कापले पाहीजेत अशी मागणी गोव्यातील अपक्ष आमदार नरेश सावळ यांनी विधानसभेत केली.

लाचखोरांचे हात कापा - गोवा विधानसभेत आमदाराची मागणी
>ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. २ - लाच घेताना रंगेहाथ सापडल्यास अशा लोकांचे हातच कापले पाहीजेत अशी मागणी गोव्यातील अपक्ष आमदार नरेश सावळ यांनी विधानसभेत केली.
गोव्याच्या भ्रष्टाचार विरोधी विभागाने किती प्रकरणात गुन्हे नोंदवले आहेत आणि किती प्रकरणात आरोपपत्रे दाखल करण्यात आले आहेत याची माहिती या आमदाराने मागितली होती. एकूण 46 प्रकरणांपैकी एकही प्रकरणात आरोपपत्रे दाखल करण्यात आली नसल्याचे सांगितल्यावर आमदार सावळ भडकले. लाच घेताना रंगेहाथ पकडूनही त्यांची प्रकरणे पडून कशी राहतात असा त्यांनी प्रश्न केला. अशा लाचखोरांचे हातच कापून टाकले पाहिजेत असे त्यांनी सांगीतले.
नंतर मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी उत्तर देताना हा लोकशाही देश असल्याचे तसेच कायदे व न्यायव्यवस्था असल्याचे सांगितले. हात कापण्याची भाषा लोकशाहीत बसत नसल्याचे ते म्हणाले.