शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
7
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
8
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
9
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
10
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
11
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
12
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
13
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
14
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
15
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
16
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
17
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
18
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

गारपीट, अवकाळी पावसाचा तडाखा, विदर्भात वीज पडून चौघांचा मृत्यू : मराठवाडा, खान्देशलाही झोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 08:49 IST

Unseasonal Rains: गेल्या दोन दिवसांपासून राज्याला अवकाळी पावसाचा तडाखा बसत असून, शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गुरुवारी पश्चिम महाराष्ट्र, लातूर, परभणी, रत्नागिरी आणि विदर्भात भंडारा तसेच यवतमाळ जिल्ह्यात मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटात पाऊस झाला.

मुंबई - गेल्या दोन दिवसांपासून राज्याला अवकाळी पावसाचा तडाखा बसत असून, शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गुरुवारी पश्चिम महाराष्ट्र, लातूर, परभणी, रत्नागिरी आणि विदर्भात भंडारा तसेच यवतमाळ जिल्ह्यात मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटात पाऊस झाला. तीन ठिकाणी वीज पडल्याने विदर्भात चौघांचा मृत्यू झाला. 

प. महाराष्ट्रात जोर’धार’ कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रातही जोरदार पाऊस झाला. कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी येथे विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस झाला. कोल्हापूर शहरात काही ठिकाणी गारपीट झाली. सांगलीत शिराळा तसेच खानापूर तालुक्यातील लेंगरे परिसरात मेघगर्जनेसह पाऊस झाला. सातारा जिल्ह्यातील पाटण येथे मुसळधार पाऊस झाला. सातारा तालुक्यातील सोनवडी, गजवडी परिसरात गारांचा पाऊस झाल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. रत्नागिरीत पहाटे मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. राजापूर, लांजा, संगमेश्वर, चिपळूण, खेड आदी भागांत जोरदार पाऊस झाला.

नागपुरात वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरीने गारवा नागपूर : नागपूरकरांची उन्हाच्या काहिलीतून पावसाने सुटका केली. बुधवारनंतर गुरुवारीही पहाटे वादळी वाऱ्यासह व दुपारी गडगडाटासह पाऊस झाला. त्यामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचले होते.  

जालना, लातुरात गारपीटपरभणी : परभणी जिल्ह्यात मानवत रोड, मानवत शहर, झरी, बामणी, येलदरी येथे वादळी वाऱ्यासह गुरुवारी दुपारी चार ते सहाच्या दरम्यान जोरदार पाऊस झाला. लातूर : शहरासह जिल्ह्यात गुरुवारी सायंकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी गारा पडल्याने कांदा, टरबूज, खरबूज, द्राक्ष पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जालना : जिल्ह्यातील विविध भागांत गुरूवारी दिवसभरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. यात फळपिकांसह रब्बीतील पिकांचेही मोठे नुकसान झाले. भोकरदन तालुक्यातील वरूड बुद्रूक येथील जिल्हा परिषद शाळेच्या तीन वर्गखोल्यांवरील पत्रे उडून गेली. भोकरदन, मंठा तालुक्यातील काही भागात गारपीटही झाली.

भंडारा २, वाशिम १, तर यवतमाळात एकाचा मृत्यूभंडारा जिल्ह्यातील पाथरी (ता. तुमसर) येथे दुपारी विजांच्या कडकडाटात पाऊस झाला. शेतातून घरी परतत असताना तिघे जण झाडाखाली थांबले होते. त्याच वेळी झाडावर वीज कोसळली. यात मनीषा भारत पुष्पतोडे (३२), प्रमोद मनिराम नागपुरे (४२) या दोघांचा मृत्यू झाला.यवतमाळमधील झरी तालुक्यात बंदी वाढोणा येथे वसंता नरसिंग चव्हाण (३८) यांचा तर वाशिम जिल्ह्यात कवठा (ता. रिसोड) येथे चंद्रविलास काठोळे (४०) या मजुराचा वीज पडून मृत्यू झाला.  

आजही अवकाळीचा इशाराभारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, मराठवाडा, विदर्भ व मध्य महाराष्ट्रात शुक्रवारीही काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटात हलका ते मध्य स्वरूपाचा पाऊस पडेल. 

नाशिक : पिकांचे नुकसाननाशिक जिल्ह्यात बुधवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसामुळे कांदा, गहू, टोमॅटो, मिरची, भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे. सर्वाधिक फटका कळवण, बागलाण तालुक्यांना बसला आहे. १२०० ते १३०० हेक्टरवरील कांद्याला फटका बसल्याचा अंदाज आहे.

टॅग्स :RainपाऊसMaharashtraमहाराष्ट्रweatherहवामान अंदाज