शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

गारपिटीचा तडाखा : राज्यात अवकाळी पावसाचे ७ बळी, मराठवाडा, विदर्भ व खान्देशवर निसर्ग कोपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 3:22 AM

यंदा लांबलेल्या पावसामुळे खरीप पिकांवर आलेल्या संकटातून बळीराजा सावरत असताना, रविवारी अवकाळी पाऊस व गारपिटीने मराठवाडा, विदर्भ आणि खान्देशात रबी पिकांसह फळबागांचे प्रचंड नुकसान झाले. गारांचा तडाखा आणि वीज कोसळून राज्यात सात जणांचा बळी गेला. गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत.

औरंगाबाद / नागपृर/ अकोला/ जळगाव : यंदा लांबलेल्या पावसामुळे खरीप पिकांवर आलेल्या संकटातून बळीराजा सावरत असताना, रविवारी अवकाळी पाऊस व गारपिटीने मराठवाडा, विदर्भ आणि खान्देशात रबी पिकांसह फळबागांचे प्रचंड नुकसान झाले. गारांचा तडाखा आणि वीज कोसळून राज्यात सात जणांचा बळी गेला. गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत.हवामान खात्याने दोन दिवसांपूर्वीच अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविला होता. मात्र, रविवारी सकाळी वादळी वाºयासह गारपीटही झाल्याने दाणादाण उडाली. तूर, हरबरा, गहू, ज्वारी ही काढणीला आलेली पिके गारांच्या तडाख्यात सापडल्याने भुईसपाट झाली, तर संत्रा आणि द्राक्ष बागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. दरम्यान, सोमवारी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह गारांचा पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़विदर्भावर वीज कोसळलीवादळी पावसासह गारपिटीचा विदर्भाला तडाखा बसला. तूर, हरभरा, गहू, मिरची व संत्राबागांचे नुकसान झाले. विदर्भात रविवारी दिवसभर विजांचा कडकडाट सुरू होता. अंगावर वीज पडून चौघांचा मृत्यू, तर १६ जण जखमी झाले. अमरावती जिल्ह्यात पहाटे झालेल्या गारपिटीमुळे रबी पिकांना जबर फटका बसला. यवतमाळ जिल्ह्यात महागाव तालुक्यातील गुंज, बिजोरा, डोंगरगाव येघे जोरदार पाऊस झाला. वरूड तालुक्यातील वाई येथे चराईसाठी जाणारी सात जनावरे वीज पडून दगावली. बुलडाणा जिल्ह्यात गारपिटीसह विजा कोसळल्या. नागपूरमध्येही अवकाळी पावसाने हजेरी लावली.७ जणांचे बळी -अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे राज्यात सात जणांचे बळी गेले आहेत. जालना जिल्ह्यात वंजारउम्रद येथील नामेदव लक्ष्मण शिंदे (६०) व निवडुंगा येथील आसाराम गणपत जगताप (६०) या दोन शेतकºयांचा आणि वाशिम जिल्ह्यातील महागाव येथील यमुनाबाई हुंबाड या वृद्ध महिलेचा गारांच्या तडाख्यात सापडून मृत्यू झाला. तर अंगावर वीज पडून बुलडाणा जिल्ह्यातील निकिता गणेश राठोड, दर्यापूर तालुक्यातील नायगाव येथील गंगाधर आत्माराम कोकाटे (७६) आणि गोंदिया जिल्ह्यातील विनोद कुसन गावळकर (२८,रा.जेठभावडा) यांचा मृत्यू झाला.पंचनाम्याचे आदेशगारपीट आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत, तसेच जिल्हा प्रशासनाने सोमवारी विमा कंपन्यांची बैठक घेऊन गावनिहाय आकडेवारी उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिले आहेत. तलाठी, ग्रामसेवक, सहायक कृषी अधिकारी यांनी नुकसानीचे पंचनामे जिल्हा प्रशासनाला सादर करून मदतीबाबत तातडीने प्रस्ताव तयार करावेत, अशी सूचनाही त्यांनी केली आहे.राज्याच्या अनेक भागांत वादळ आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानाचे तातडीने पंचनामे करून, सरकारने गारपिटग्रस्तांना अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्याअगोदर भरपाई द्यावी.-राधाकृष्ण विखे पाटील, विरोधी पक्षनेतेजळगाव जिल्ह्याला तडाखा : गिरणा व तापी नदीच्या पट्ट्यातील गावांमध्ये गारपीट झाली. त्यात गहू, हरभरा पिकाचे नुकसान झाले असून, केळीच्या बागाला फटका बसला आहे. हाताशी आलेला रब्बीच्या हंगामाला फटका बसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.मराठवाड्यात काश्मीरसदृश्य स्थितीसर्वत्र गारांचा खच साचल्याने जालना, परभणी व बीड जिल्ह्यात तर काश्मीरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. सुमारे दीडशे ग्राम वजनाच्या गारांचा मारा झाल्याने अनेक जण जखमी झाले. जालना जिल्ह्यातील जाफराबाद, मंठा, अंबड, घनसावंगी, बीड जिल्ह्यातील शिरुर, वडवणी, गेवराई, माजलगाव तालुक्यात आणि परभणी जिल्ह्यातील जिंतुर तालुक्याला या गारपिटीचा फटका बसला.

टॅग्स :Rainपाऊस