शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
2
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
3
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
4
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
5
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
6
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
7
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
8
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
9
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
10
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
11
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
12
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
13
सामान्य माणसाला न्याय हे बळकट लोकशाहीचे प्रतिक - सरन्यायाधीश भूषण गवई
14
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
15
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
16
२०३० पर्यंत मुंबई रेबिजमुक्त करणार; पालिकेचा संकल्प, जनजागृती करणार
17
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
18
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
19
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
20
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर

राज्यात आठ वर्षांच्या बंदी काळात अडीचशे कोटींचा गुटखा-पानमसाला जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2020 14:00 IST

बंदीला आठ वर्षे पूर्ण झाल्यानंतरही, गुटखा-पानमसाल्याची अवैध निर्मिती आणि वाहतूक रोखण्यात प्रशासनाला अपयश

ठळक मुद्देराज्यात गुटखा आणि पानमसाल्यावर बंदी तरी दरवर्षी अधिकाधिक गुटखा जप्तजवळपास सव्वासहा हजारांहून अधिक जणांवर खटलेही दाखल राज्य सरकारने जुलै २०१२-१३ मध्ये गुटखा आणि पानमसाल्यावर घातली बंदी

विशाल शिर्के पिंपरी : राज्यात गुटखा आणि पानमसाल्यावरील बंदीला आठ वर्षे पूर्ण झाल्यानंतरही, गुटखा-पानमसाल्याची अवैध निर्मिती आणि वाहतूक रोखण्यात अन्न आणि औषध प्रशासन (एफडीए) व पोलीस प्रशासनाला अपयश आले आहे. या काळामध्ये तब्बल २५६ कोटी रुपयांचा गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखूचा साठा राज्यभरातून जप्त केला आहे. जवळपास सव्वासहा हजारांहून अधिक जणांवर खटलेही दाखल झाले आहेत.  केंद्र सरकारच्या कुटुंब कल्याण मंत्रालयाने २७ ऑगस्ट २०१२ रोजी अन्न सुरक्षा मानदे कायदा २००६ची अंमलबजावणी करण्याची विनंती देशातील राज्य सरकारला केली होती. त्यानुसार राज्य सरकारने जुलै २०१२-१३ मध्ये गुटखा आणि पानमसाल्यावर बंदी घातली. गेल्या आठ वर्षांपासून राज्यात गुटखा आणि पानमसाल्यावर बंदी असली तरी, बंदी काळामध्ये दर वर्षी अधिकाधिक गुटखा जप्त केला जात आहे. बंदी घातलेल्या २०१२-१३ या वर्षी एफडीए आणि पोलिसांच्या कारवाईत २० कोटी ७४ लाख रुपयांचा गुटखा आणि इतर पदार्थांचा साठा आढळला होता. तर, २०१९-२० या वर्षात सर्वाधिक ५७ कोटी २८ लाख रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे. गुटख्याच्या अवैध उत्पादन युनिटदेखील एफडीएने उघडकीस आणले होते. त्याचबरोबर गुजरातमध्ये निर्माण झालेला आणि त्यावर ‘केवळ निर्यातीसाठी’ असा असलेला गुटखादेखील छाप्यामध्ये आढळून आला आहे. या धंद्याची पाळेमुळे खणून काढण्यात एफडीए आणि पोलीस प्रशासनाला अपयश आल्याचे दिसून येत आहे. सापडलेला गुटखा आणि पानमसाल्याचा साठा केवळ हिमनगाचे टोक असल्याचे सांगितले जात आहे. लॉकडाऊन काळात साडेतेरा कोटींचा गुटखा जप्त कोरोनाचा (कोविड-१९) प्रसार रोखण्यासाठी २४ मार्च रोजी लॉकडाऊन लागू झाले. या काळामध्ये राज्यभरात केलेल्या तपासणी तब्बल १३ कोटी ४६ लाख ५२ हजार रुपयांचा गुटखा-पानमसाल्याचा साठा जप्त करण्यात आला आहे. च्गेल्या आठ वर्षांतील कारवाईत आढळलेल्या एकूण साठ्याच्या ५.२४ टक्के गुटखा-पानमसाला एप्रिल ते जून या तीन महिन्यांतच जप्त केला आहे. ......एफडीएची २०१२-१३ ते जून २०२० पर्यंतची कारवाईतपासणी केलेल्या पेढ्यांची संख्या - 96,018गुटखा-पानमसाला आढळलेल्या पेढ्या  - 10,237

एफआयआर दाखल पेढ्या  -5,757

एकूण दाखल खटले - 6,375 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcorona virusकोरोना वायरस बातम्याCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसFDAएफडीए