साईचरणी तीन कोटींची गुरुदक्षिणा

By Admin | Updated: August 2, 2015 03:00 IST2015-08-02T03:00:00+5:302015-08-02T03:00:00+5:30

गुरूपौर्णिमा उत्सवादरम्यान भक्तांनी साईचरणी भरभरून गुरूदक्षिणा अर्पण केल्याने गेल्या तीन दिवसांत संस्थान तिजोरीत तब्बल तीन कोटी आठ लाखांची देणगी जमा झाली.

Gurudakshina of three crores of literature | साईचरणी तीन कोटींची गुरुदक्षिणा

साईचरणी तीन कोटींची गुरुदक्षिणा

शिर्डी : गुरूपौर्णिमा उत्सवादरम्यान भक्तांनी साईचरणी भरभरून गुरूदक्षिणा अर्पण केल्याने गेल्या तीन दिवसांत संस्थान तिजोरीत तब्बल तीन कोटी आठ लाखांची देणगी जमा झाली.
गुरूपौर्णिमा उत्सवात जवळपास तीन लाख भाविकांनी साई समाधीचे दर्शन घेतले. २९ ते ३१ जुलैदरम्यानच्या दानाची शनिवारी मोजदाद करण्यात आली. देणगी काऊंटरवर ७५ लाख रुपये, हुंडीत (देणगी पेटी) २ कोटी २५ लाख रुपये प्राप्त झाले आहेत़ याशिवाय ३११ ग्रॅम सोने, सात किलो चांदीच्या मौल्यवान वस्तू दान स्वरुपात मिळाल्या आहेत. साई संस्थान तिजोरीत सध्या जवळपास ३७८ किलो सोने, चार हजार किलो चांदी तर वेगवेळ्या राष्ट्रीयकृत बँकामध्ये १,४४७ कोटींच्या ठेवी आहेत़ (प्रतिनिधी)

Web Title: Gurudakshina of three crores of literature