गिरगावात इमारतीचा भाग कोसळला, रहिवाशांची सुखरूप सुटका

By Admin | Updated: July 30, 2016 11:41 IST2016-07-30T09:20:08+5:302016-07-30T11:41:10+5:30

गिरगावातील भटवाडी येथील पाठारे इमारतीचा काही भाग कोसळला.

Gurgaon building collapses, rescues of residents safely | गिरगावात इमारतीचा भाग कोसळला, रहिवाशांची सुखरूप सुटका

गिरगावात इमारतीचा भाग कोसळला, रहिवाशांची सुखरूप सुटका

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३० - गिरगावातील भटवाडी येथील पाठारे इमारतीचा काही भाग कोसळला. या इमारतीत अडकलेल्या तीन रहिवाशांची  बचावपथकाच्या अधिका-यांनी सुखरूपरित्या सुटका केली असून असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. 
मिळालेल्या माहितीनुसार, गिरगावमधील जगन्नाथ शंकरशेठ मार्गावरील आर्यन शाळेजवळील गल्लीतील पाठारे हाऊल पाठारे हाऊस इमारतीच्या तिस-या मजल्याचा काही भाग शनिवारी सकाळी अचानक कोसळला व त्यामध्ये तीन रहिवासी अडकले. 
या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ४ गाड्या व ३ अॅम्ब्युलन्स घटनास्थळी दाखल झाल्या. बचावपथकाच्या अधिका-यांनी शर्थीचे प्रयत्न करून अडकलेल्या तिघांनाही सुखरुपरित्या बाहेर काढले. रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे इमारतीचा भाग कोसळल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. 
 
 
 
 
 
 
 
 
 

Web Title: Gurgaon building collapses, rescues of residents safely

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.