शहरं
Join us  
Trending Stories
1
Big Breaking: तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात अखेर डॉ. सुश्रुत घैसास यांच्यावर गुन्हा दाखल
2
"देशात धार्मिक युद्ध भडकवण्यासाठी सुप्रीम कोर्ट जबाबदार"; मर्यादेबाहेर जाताय म्हणत भाजप खासदाराची टीका
3
IPL 2025 Video: 'सुपरमॅन' कॅच! विपराजला हवा होता चौकार, पण जोस बलटरने हवेत उडत घेतला भन्नाट झेल
4
राज ठाकरेंशी युती झाल्यास उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार का?; संजय राऊत म्हणाले...
5
Video - अग्निकल्लोळ! एका ठिणगीमुळे बोटीला भीषण आग; १४८ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
“मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमुळे राज ठाकरेंची उपयुक्तता सर्वांना वाटत आहे”: छगन भुजबळ
7
“राहुल गांधींचा ‘डरो मत’ संदेश अमलात आणू, एकता, अखंडतेची मशाल घेऊन वाटचाल करू”: सपकाळ
8
Maharashtra Politics : राज ठाकरे अन् उद्धव ठाकरे एकत्र येणार का? संजय राऊतांनी सगळंच सांगितलं
9
“इथले मीठ खाता अन् मराठीला विरोध करता? हिंदीची सक्ती होऊ देणार नाही”; उद्धव ठाकरेंनी ठणकावले
10
IPL 2025: चेन्नई सुपर किंग्जमध्ये आला 'बेबी एबी'; अशी आहे टी२० कारकीर्द
11
“कार्यकर्त्यांनी कठोर मेहनत घ्यावी, ५ वर्षांनंतर काँग्रेस पुन्हा सत्तेत येईल”: नाना पटोले
12
"मी ज्या झोपडपट्टीतून आलोय...", दिसण्यावरून ट्रोल करणाऱ्यांना सिद्धार्थ जाधवची सणसणीत चपराक
13
गुजरातविरुद्ध केएल राहुलचा विक्रमी षटकार; रोहित, विराट आणि धोनीच्या पंक्तीत झाला सामील
14
'तो' प्रवास ठरला शेवटचा! गायीला वाचवण्याच्या प्रयत्नात कार कालव्यात पडली, एअर होस्टेसचा मृत्यू
15
'हिंदू आहोत हा आमचा गुन्हा आहे का?', पश्चिम बंगाल हिंसाचार बाधित महिलांचा भावनिक सवाल
16
“आम्ही कुटुंब फोडणारे नाही, राज अन् उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर स्वागतच”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना गती; शिंदे गटातील नेत्यांची प्रतिक्रिया म्हणाले...
18
Vastu Tips: पायपुसण्याखाली ठेवा कापराच्या दोन वड्या, होतील चमत्कारिक फायदे!
19
"किती दिवस स्वप्नीलसाठी फक्त टाळ्या वाजवायच्या?"; सोनाली कुलकर्णीचं वक्तव्य चर्चेत

निवडणुकीचा ‘अचूक ’ अंदाज सांगा, २१ लाखांचं बक्षीस जिंका ; भविष्यवेत्त्यांना अंनिसचं आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2019 20:58 IST

गंडे, दोरे, ताईत देऊन मंत्र तंत्र विद्या अवगत असल्याचे भासविणारे बाबा, महाराजही निवडणुकीच्या निमित्ताने सक्रिय झाले आहेत.

पिंपरी : लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. निवडणुकपुर्वी केलेल्या सर्व्हेच्या आधारे, तसेच मतदारांचा कल लक्षात घेऊन विविध संस्था निवडणुकीत कोणत्या पक्षाला बहुमत मिळेल, कोणता पक्ष दुसºया क्रमांकाची मते मिळवेल, याचा अंदाज व्यकत करत असतात. गंडे, दोरे, ताईत देऊन मंत्र तंत्र विद्या अवगत असल्याचे भासविणारे बाबा, महाराजही निवडणुकीच्या निमित्ताने सक्रिय झाले आहेत. गतवेळी अचूक भाकीत केले, महाराजांनी केलेले भाकीत तंतोतत खरे ठरले. असे दावे केले जातात. अशा भविष्यवेत्यांना आणि ज्योतिषां नामहाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीने यावेळी खुले आव्हान दिले आहे. लोकसभा निवडणुकीचे अचूक भाकित सांगा अन् २१ लाखांचे बक्षिस मिळवा. असे हे आव्हान दिले असून यास कोणी प्रतिसाद देतो का याची अंनिसला प्रतिक्षा आहे. महाराष्टÑ अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे राज्य प्रधान सचिव मिलिंद देशमुख यांनी अंधश्रद्धा निर्मुलन समितीची आव्हान देण्यामागील भूमिका विशद केली आहे. विविध प्रकारची भाकित करून नागरिकांची दिशाभूल करणारे अनेक ज्योतिषी तसेच भविष्यवेते ठिकठिकाणी कार्यरत आहेत. निवडणूक झाल्यानंतर आम्ही केलेला दावा तंतोतंत खरा ठरला, असे म्हणणारे भविष्यवेते देशात आणि राज्यात अनेक आहेत. निवडणुकीपुर्वी मात्र निवडणुक निकाल असा लागेल, याचा अचूक अंदाज देण्याचे धाडस कोणी दाखवत नाही. निवडून आलेल्या उमेदवारांपैकी अमूक उमेदवार आमच्या संपर्कात होते, त्यांना निवडणुकीत यशस्वी होण्यासाठी आपलीच मंत्र तंत्र विद्या कामी आली. असे सांगून आपली पाठ थोपाटणारे अनेक भोंदू बाबाही अनेक आहेत. त्यांचे निवडणूक निकालाचे अंदाज चुकल्यास भोंदुगिरी उघड होईल, या भितीने अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे आव्हान स्विकारण्याचे धाडस करण्यास कोणीही पुढे येईना. अशी सद्यस्थिती आहे. निवडणूक जिंकण्यासाठी वाट्टेल ते करण्याची काही उमेदवारांनी तयारी ठेवलेली असते. साम,दाम,दंड,भेद या तंत्राचा अवलंब केला जातो. त्याचबरोबर महाराज, बाबांच्या संपर्कात राहून गंडे दोर, मंत्र तंत्र विद्येचा उपयोग करून घेण्याचाही काही उमेदवार केविलवाना प्रयत्न करताना दिसून येतात. अगदी उमेदवारी अर्ज कोणत्या महुर्तावर,कोणत्यावेळी भरणे शुभ आणि लाभदायक ठरू शकते, याबद्दलचेही मार्गदर्शन महराजांकडून घेतले जाते. त्यानंतरच पुढील प्रचाराची तयारी केली जाते. निवडणूक काळात महाराज, बाबांची चलती आहे.

झाकली मूठ ...सव्वा लाखांची 

अंनिसने ज्योतिषांना निवडणूक निकाल अंदाज अचूक वर्तविण्याचे आव्हान केले आहे. चूक झाल्यास नामुष्की ओढवणार या भितीने भविष्यवेते झाकली मूठ सव्वा लाखाची या उक्तीप्रमाणे अंनिसचे आव्हान पेलण्यास पुढे सरसावत नाहीत. नागरिकांमध्ये अंधश्रद्धा पसरविण्याचा बुरखा फाडण्याची हिच योग्य वेळ असते. हे लक्षात घेऊन निवडणुकीचे अचूक अंदाज द्या, २१ लाखांचे बक्षिस मिळवा. असे आव्हान ज्योतिष आणि भविष्यवेत्यांसाठी अंनिसने केले आहे. प्रतिसाद मिळणे अशक्य आहे, असा विश्वास अंनिसच्या पदाधिकाऱ्यांनी व्यकत केला आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtra Andhashraddha Nirmulan Samitiमहाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीAstrologyफलज्योतिषLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक