अखेर गुडेवार यांची बदली!

By Admin | Updated: June 24, 2014 00:58 IST2014-06-24T00:58:11+5:302014-06-24T00:58:11+5:30

‘दुकानदारी’ बंद झाल्यामुळे काहींच्या ‘डोक्यात’ बसलेले सोलापूर महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांची अखेर शासनाने ग्रामविकास खात्यात बदली केली

Gudawar was finally replaced! | अखेर गुडेवार यांची बदली!

अखेर गुडेवार यांची बदली!

>सोलापूर : शहरात 11 महिन्यांत ‘धडाकेबाज’ काम करत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला तर ‘दुकानदारी’ बंद झाल्यामुळे काहींच्या ‘डोक्यात’ बसलेले सोलापूर महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांची अखेर शासनाने ग्रामविकास खात्यात बदली केली आह़े राजकीय दबावापोटी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बदलीच्या फाईलवर सोमवारी सही करून मालेगाव महापालिकेचे आयुक्त अजित जाधव यांची त्यांच्या जागी नियुक्ती केली आह़े  
4 जुलै 2क्13 रोजी महापालिका आयुक्त म्हणून चंद्रकांत गुडेवार यांची नियुक्ती शासनाने केली होती़ ग्रामविकास खात्याकडून नगरविकास खात्याकडे त्यांची प्रतिनियुक्तीवर बदली करण्यात आली होती़ रुजू झाल्यापासून धडाकेबाज कामच्या पद्धतीमुळे त्यांना बदलण्यासाठी षडयंत्र रचले जात होत़े एका वर्षात मी तीन वर्षाचे काम करतो, असे ठासून सांगणा:या आयुक्त गुडेवार यांचा मात्र राजकीय बळी घेण्यात आला़ वर्ष होण्यापूर्वीच त्यांना बदलण्यात आल़े आठ दिवसांपूर्वी त्यांनी सोलापूर जिल्हा परिषदेचा अतिरिक्त पदभार स्वीकारला, तेथे देखील धडाकेबाज काम सुरू केले होत़े शुक्रवारपासून त्यांच्या बदलीच्या चर्चेमुळे शहरात आंदोलने सुरू झाली होती़ (प्रतिनिधी)

Web Title: Gudawar was finally replaced!