Sunetra Ajit Pawar News: अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनाने रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्रिपदासाठी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा शपथविधी लोकभवनवर साध्या पद्धतीने झाला. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. यानंतर आता सुनेत्रा अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला. तसेच आपल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहभागही घेतला. अजित पवार यांच्याकडे असलेले पुणे आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपदही सुनेत्रा पवार यांच्याकडे देण्यात आले आहे. या दोन्ही जिल्ह्यातील कामकाजाला सुनेत्रा अजित पवार यांनी सुरुवात केली.
उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर सुनेत्रा अजित पवार या दिल्लीला रवाना झाल्या. सुनेत्रा पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांची संसदेत भेट घेतली. याशिवाय, उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचीही भेट घेतली. यावेळी पार्थ पवार, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल व खासदार सुनील तटकरे हेदेखील उपस्थित होते. यानंतर लगेचच सुनेत्रा पवार यांनी पुणे आणि बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीच्या कामकाजात सहभागी झाल्या. यावेळी सुनेत्रा पवार यांनी महत्त्वाचे निर्देश दिले. याबाबतची माहिती सुनेत्रा पवार यांनी एक्सवर पोस्ट करून दिली आहे.
दादांच्या विकासाभिमुख धोरणांचा वारसा पुढे नेण्यावर भर
बीड जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. यावेळी विकासकामांसाठीचा संपूर्ण निधी योग्य व काटेकोर पद्धतीने खर्च व्हावा, ठरलेल्या वेळेत सर्व कामे पूर्ण व्हावीत, बांधकामांचा दर्जा उत्कृष्ट असावा आणि कोणतीही कामे अर्धवट राहू नयेत, अशा स्पष्ट सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. त्याचप्रमाणे दादांच्या विकासाभिमुख धोरणांचा वारसा पुढे नेत, जिल्ह्यातील प्रत्येक प्रकल्प नियोजनबद्ध, पारदर्शक आणि परिणामकारक पद्धतीने पूर्ण व्हावे, यावर विशेष भर देण्यात आला. पुढील वर्षाचे नियोजन प्राधान्याने आणि वेळेत पूर्ण करून बीड जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीस गती देण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
दरम्यान, पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्ह्यातील विविध विकासकामांचा सविस्तर आढावा घेतला. जिल्ह्याचा विकास हा गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण झाला पाहिजे, असे सुनेत्रा पवार यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी मंजूर कामे ठरलेल्या वेळेत पूर्ण करणे, प्रत्येक बांधकामाचा दर्जा उत्कृष्ट व टिकाऊ ठेवणे आणि पुढील वर्षाचे नियोजन प्राधान्यक्रम ठरवून वेळेत पूर्ण करणे, अशा ठोस सूचना संबंधित यंत्रणांना दिल्या. पुणे जिल्ह्याचा विकास अधिक गतिमान, पारदर्शक आणि परिणामकारक झाला पाहिजे, याकरिता गुणवत्तेशी तडजोड न करता, जबाबदारीची जाणीव ठेवून व जनतेच्या अपेक्षा केंद्रस्थानी ठेवून आपण पुढे जाऊ, असा विश्वास सुनेत्रा पवार यांनी यावेळी व्यक्त केला.
Web Summary : Sunetra Pawar, after taking oath as Deputy Chief Minister, reviewed development works in Pune and Beed. She emphasized timely completion, quality construction, and transparent project execution in district planning meetings, continuing her predecessor's vision.
Web Summary : उपमुख्यमंत्री पद की शपथ लेने के बाद, सुनेत्रा पवार ने पुणे और बीड में विकास कार्यों की समीक्षा की। उन्होंने जिला योजना बैठकों में समय पर पूरा होने, गुणवत्तापूर्ण निर्माण और पारदर्शी परियोजना निष्पादन पर जोर दिया, पूर्ववर्ती के दृष्टिकोण को जारी रखा।