मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी राज्याच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली. धनंजय मुंडे यांना यादीतून वगळले आहे. मुंंडे यांच्याकडे कोणत्याही जिल्ह्याचे पालकमंत्रीपद न देता त्यांचा जिल्हा असलेल्या बीडचे पालकमंत्रीपद उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपविण्यात आले आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी अपेक्षेप्रमाणे गडचिरोलीचे पालकमंत्रीपद आपल्याकडे ठेवले आहे. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठाणे आणि मुंबई शहर तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बीडबरोबरच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे. गडचिरोली, मुंबई उपनगर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांत सह पालकमंत्री नियुक्त करण्यात आले आहेत.
प्रथमच सह पालकमंत्री पदमुंबई उपनगरचे पालकमंत्री पद मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांना आणि मंगलप्रभात लोढा यांना सह पालकमंत्री पद देण्यात आले. अशा प्रकारे सह पालकमंत्री पद हे पहिल्यांदाच निर्माण करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठाण्याबरोबरच मुंबई शहराचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे.
मिसाळ सह पालकमंत्रीकोल्हापूरचे पालकमंत्री पद शिंदेसेनेचे प्रकाश आबिटकर यांना तर याच जिल्ह्याचे सह पालकमंत्री पद भाजपच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांना मिळाले. आशिष जयस्वाल यांना गडचिरोलीचे सह पालकमंत्री करण्यात आले आहे.
असे आहेत जिल्ह्यांचे पालकमंत्रीगडचिरोली देवेंद्र फडणवीस, आशिष जयस्वाल (सह पालकमंत्री)नागपूर चंद्रशेखर बावनकुळेअमरावती चंद्रशेखर बावनकुळेवाशिम हसन मुश्रीफयवतमाळ संजय राठोडचंद्रपूर अशोक उईकेभंडारा संजय सावकारेबुलढाणा मकरंद पाटीलअकोला आकाश फुंडकरगोंदिया बाबासाहेब पाटीलवर्धा पंकज भोयरबीड अजित पवारजालना पंकजा मुंडेनांदेड अतुल सावेलातूर शिवेंद्रसिंहराजे भोसलेनंदूरबार माणिकराव कोकाटेहिंगोली नरहरी झिरवाळछ. संभाजीनगर संजय शिरसाटधाराशिव प्रताप सरनाईकपरभणी मेघना बोर्डीकरमुंबई शहर एकनाथ शिंदेमुंबई उपनगर ॲड. आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा (सह-पालकमंत्री)ठाणे एकनाथ शिंदेपालघर गणेश नाईकरायगड आदिती तटकरेरत्नागिरी उदय सामंतसिंधुदुर्ग नितेश राणेपुणे अजित पवारसोलापूर जयकुमार गोरेसांगली चंद्रकांत पाटीलकोल्हापूर प्रकाश आबिटकर, माधुरी मिसाळ (सह पालकमंत्री)सातारा शंभूराज देसाईनाशिक गिरीश महाजनअहिल्यानगर राधाकृष्ण विखे-पाटीलजळगाव गुलाबराव पाटीलधुळे जयकुमार रावल
- रायगडचे पालकमंत्री पद अजित पवार गटाच्या आदिती तटकरे यांना की शिंदेसेनेचे मंत्री भरत गोगावले यांच्याकडे जाणार, याबाबत उत्सुकता होती. त्यात तटकरे यांनी बाजी मारली.
- जळगावचे पालकमंत्री पद शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना देण्यात आले, तर या जिल्ह्यातील भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे नाशिकचे पालकमंत्री पद देण्यात आले.
- सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना त्यांच्याकडे बीडचे पालकमंत्रीपद देऊ नये, अशी मागणी होत होती.