शहरं
Join us  
Trending Stories
1
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
2
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
3
एका सल्ल्यासाठी ₹११ कोटी! पीकेंच्या कमाईचे आकडे पाहून चक्रावून जाल; ₹९८ कोटी दान केले...
4
'त्या नारी शक्तीचे एक उदाहरण...', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जॉर्जिया मेलोनी यांच्या आत्मचरित्राला प्रस्तावना लिहिली
5
प्रशांत किशोर यांची 3 वर्षांची कमाई बघून थक्क व्हाल, जन सूरज पक्षाला डोनेट केले तब्बल 98 कोटी!
6
अरेरे! लहान वयात केस पिकले, नारळाच्या तेलात 'हे' मिसळा; चिंता सोडा, पांढऱ्या केसांना टाटा करा
7
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
8
'हे' मेड इन इंडिया मॅसेजिंग अ‍ॅप घेणार WhatsApp ची जागा? दुर्गम भागातील लोकांना होणार फायदा?
9
एशिया कप 2025 चा हिरो: विजयाचा तिलक लावला खरा, पण कुटुंबाचे २०२२ पर्यंत स्वत:चे घर नव्हते...; वडील इलेक्ट्रीशिअन...
10
ऑटो कंपन्यांचे पाकिस्तानातून पलायन! सरकारकडून सेकंड हॅन्ड गाड्यांना आयात करण्यासाठी परवानगी
11
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
12
वनप्लस १३ नंतर १४ नाही, थेट १५ सिरीज बाजारात आणणार; भारतात कधी लाँच होणार... 
13
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंच्या नावाची रस्त्यावर रांगोळी; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
14
सणासुदीच्या काळात सावध राहा! सायबर गुन्हेगार AI वापरुन करतायेत फसवणूक; कसं राहाल सुरक्षित?
15
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
16
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
17
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
18
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
19
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
20
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप

विधानसभेला १६० जागा निवडून देण्याची गॅरंटी, 'त्या'२ जणांची ऑफर; शरद पवारांचा सर्वात मोठा दावा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 12:40 IST

निवडणुकीच्या पद्धतीबाबत लोकांमध्ये शंका निर्माण होणे योग्य नाही. त्यामुळे राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी शरद पवारांनी केली.

मुंबई - काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करत मतचोरी केल्याचं म्हटलं आहे. त्यात आता ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही सर्वात मोठा दावा केला आहे. विधानसभा निवडणुकीत १६० जागा निवडून आणण्याची गॅरंटी २ जणांनी मला भेटून दिली होती असं पवारांनी म्हटलं. मात्र पवारांच्या या विधानावर भाजपानेही पलटवार केला आहे.

शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं की, विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या, त्यानंतर दिल्लीत मला काही जण भेटायला आले. २ जण होते. महाराष्ट्रात २८८ विधानसभेच्या जागा आहेत. आम्ही तुम्हाला १६० जागा निवडून येण्याची गॅरंटी देतो अशी त्यांनी ऑफर दिली. तेव्हा माझ्या मनात निवडणूक आयोग याबद्दल काही शंका नव्हती. असे लोक भेटत असतात मात्र मी त्याकडे दुर्लक्ष करतो. या भेटीनंतर राहुल गांधी यांच्यासोबत मी त्या लोकांची भेट घालून दिली. त्या लोकांना जे म्हणायचे होते, ते त्यांनी राहुल गांधींसमोर म्हटले. परंतु राहुल गांधी आणि माझं मत या कामात आपण पडू नये, हा आपला रस्ता नाही. आपण लोकांपर्यंत जाऊ, लोकांचा पाठिंबा मागू, जे निर्णय असेल तो स्वीकारू असं ठरले असं त्यांनी सांगितले. 

निवडणूक आयोगाने उत्तर द्यावे, भाजपानेही नाही

तसेच निवडणुकीच्या पद्धतीबाबत लोकांमध्ये शंका निर्माण होणे योग्य नाही. त्यामुळे राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांची सखोल चौकशी झाली पाहिजे. जे काही दूध का दूध, पानी का पानी झाले पाहिजे हा आमचा आग्रह आहे. आक्षेप हा मुख्यमंत्र्‍यांबद्दल नाही. आक्षेप निवडणूक आयोगावर घेतला आहे. मग भारतीय जनता पार्टी आणि मुख्यमंत्री नेहमी पुढे येऊन का बोलतात हे समजत नाही. आम्हाला निवडणूक आयोगाकडून उत्तर हवंय, दुसऱ्यांकडून नाही. आमची माहिती चुकीची असेल तर निवडणूक आयोगाने देशाला सांगायला हवे. सत्य समोर यायला हवे. सोमवारी संसदेतील आमचे सगळे सहकारी निवडणूक आयोगावर मोर्चा काढणार आहेत असं शरद पवारांनी सांगितले. 

दरम्यान, राहुल गांधी यांनी जी पत्रकार परिषद घेतली, त्यात कर्नाटक, महाराष्ट्र राज्यातील मतदारांबाबत भाष्य केले, जिथे निवडणूक नाही. लोकांसमोर जे आरोप ठेवले आहेत त्यावर गृहमंत्र्यांची उत्तर देण्याची जबाबदारी होती. मात्र आरोपांपासून दुसरीकडे लक्ष वळवण्याचं काम भाजपाकडून केले जात आहे. मागील १५ दिवसांपासून मतदार याद्यांच्या घोळाबाबत संसदेत गदारोळ सुरू आहे असं पवारांनी म्हटलं. 

'त्या' दोघांचा सरकारने शोध घ्यावा - भाजपा

शरद पवारांचा दावा अत्यंत बालिश आणि हास्यास्पद आहेत. पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याने बालबोध दावे करणारे खरेच आश्चर्यकारक आहेत. जर आपल्याकडे अशी २ माणसे आली होती तर तुम्हाला निवडणुकीत काही गडबड करायची होती का हा उद्देश होता का, त्या माणसांबाबत तातडीने पोलीस किंवा संबंधित यंत्रणांकडे तक्रार का केली नाहीत. उलटपक्षी या लोकांना घेऊन तुम्ही राहुल गांधींकडे गेला. म्हणजेच राहुल गांधी यांच्याशी चर्चा करून तुम्हाला अशा गोष्टींना समर्थन देण्याचा विचार होता का, त्यामुळे आता सगळे झालंय, राहुल गांधी, काँग्रेस, शरद पवार हे सगळे विचलित झालेत. हतबलतेतून या गोष्टी पुढे येत आहेत. लोकसभेला तुमच्या बाजूने निकाल लागला तेव्हा तुम्हीच याच प्रकाराचा आधार घेतला पण विधानसभेला शक्य झाले नाही असं म्हणायचे का..हे कुणाला पटणारे नाही. जेव्हा तुमच्याकडे हा प्रकार आला तेव्हाच तक्रार केली पाहिजे होती. या २ व्यक्ती कोण याचा तपास झाला पाहिजे किंवा सरकारने यात सुमोटा घेऊन त्या २ व्यक्तींचा शोध घेतला पाहिजे अशी मागणी करत भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी पवारांचा दावा फेटाळला आहे.  

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारcongressकाँग्रेसElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपा