‘जीएसटीमुळे ऐतिहासिक पर्व सुरू’

By Admin | Updated: July 7, 2017 04:06 IST2017-07-07T04:06:57+5:302017-07-07T04:06:57+5:30

जीएसटीमुळे ऐतिहासिक पर्व सुरू झाले आहे. करप्रणालीमध्ये आमूलाग्र बदल करीत व्यापारी, सामान्य नागरिकांना दिलासा देत

GST starts historic era | ‘जीएसटीमुळे ऐतिहासिक पर्व सुरू’

‘जीएसटीमुळे ऐतिहासिक पर्व सुरू’

लोकमत न्यूज नेटवर्क
ओरोस (जि. सिंधुदुर्ग) : जीएसटीमुळे ऐतिहासिक पर्व सुरू झाले आहे. करप्रणालीमध्ये आमूलाग्र बदल करीत व्यापारी, सामान्य नागरिकांना दिलासा देत सरकारने ही सुविधा निर्माण केली असून त्यामुळे सर्वांचे जीवन सुखकर होणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी गुरुवारी येथे केले.
ओरोस मुख्यालयाच्या नियोजन सभागृहात आयोजित जीएसटी व मुद्रा योजना कार्यशाळेत ते बोलत होते. प्रभू यांनी जीएसटी व मुद्रा योजनेसंदर्भात सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या परिस्थितीचा आढावा घेतला.

Web Title: GST starts historic era