शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

मराठी चित्रपटांच्या तिकिटांवरील जीएसटी रद्द करावा; अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2020 20:08 IST

मराठी चित्रपटांच्या तिकिटांवर १२ व १८ टक्के असा जीएसटी

ठळक मुद्दे व्यावसायिक संमेलनापासून ते मराठी चित्रपटांवरील जीएसटीपर्यंत विविध मागण्यापहिल्या मराठी चित्रपट व्यावसायिक संमेलनासाठी आर्थिक सहकार्य करण्याचे आश्वासन

पुणे : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वतीने चित्रपट व्यावसायिकांचे संमेलन व्हावे, तसेच मराठी चित्रपटांच्या तिकिटांवरील जीएसटी रद्द करण्यात यावा आदी मागण्यांचे निवेदन चित्रपट महामंडळाच्या शिष्टमंडळाने नुकतेच उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांना दिले.महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांची नुकतीच भेट घेतली. यावेळी व्यावसायिक संमेलनापासून ते मराठी चित्रपटांवरील जीएसटीपर्यंत विविध मागण्या करण्यात आल्या. या मागण्यांची दखल घेऊन त्याची पूर्तता करण्यात येईल तसेच पुण्यात होणाऱ्या पहिल्या मराठी चित्रपट व्यावसायिक संमेलनासाठी आर्थिक सहकार्य करण्याचे आश्वासनही पवार यांनी दिल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

महामंडळाच्या वतीने चित्रपट व्यावसायिकांचे संमेलन पुण्यात नोव्हेंबर किंवा डिसेंबर २०२०मध्ये आयोजित करण्यात येणार आहे. व्यावसायिकांना येणाºया अडचणी, चित्रपटविषयक तक्रारी, चित्रपटनिर्मितीविषयी पुढील दिशा अशा अनेक विषयांवर चर्चा होणार आहे. छायाचित्र प्रदर्शन ते शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलपर्यंतचे उपक्रम त्यात राबविण्यात येतील. मात्र, या संमेलनाचा खर्च महामंडळाला पेलवणारा नाही. संमेलनासाठी अंदाजे २ कोटी ६० लाख रुपये खर्च अपेक्षित असून, महाराष्ट्र सरकारने त्यासाठी एक कोटीचे अर्थसाह्य करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे अजित पवार यांच्याकडे करण्यात आली. त्याशिवाय हे संमेलन दर वर्षी व्हावे, हेही त्यात नमूद करण्यात आले.या संमेलनात चित्रपट व्यावसायिकांचे प्रश्न जाणून त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यासाठी हे संमेलन दरवर्षी व्हावे, अशी मागणी केली आहे. तसेच, मराठी चित्रपट सध्या अडचणीत आहे. अशावेळी चित्रपटांच्या दरावर १२ व १८ टक्के असा जीएसटी आकारण्यात येत आहे. यापूर्वीच्या जीआरप्रमाणे मराठी चित्रपटांच्या तिकिटांवर  मनोरंजन कर आकारला जात नव्हता. आता १२ व १८ टक्के असा जीएसटी आकारला जात आहे.

राज्य सरकारने जीएसटी रद्द करावा आणि आतापर्यंत आकारलेला जीएसटी निर्मात्यांना परत द्यावा, अशी मागणी करण्यात आली. यावरही पवार यांनी सकारात्मक विचार करू, असे सांगितल्याचे महामंडळाच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले.०००

 

टॅग्स :PuneपुणेcinemaसिनेमाAjit Pawarअजित पवारGSTजीएसटीState Governmentराज्य सरकार