शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाला एवढ्या जागा, केंद्रात सत्ताबदल होण्याची दाट शक्यता; पृथ्वीराज चव्हाणांचा महाराष्ट्रावर काय अंदाज...
2
लोकसभेनंतर कर्नाटकात ऑपरेशन नाथ, काँग्रेस सरकार कोसळणार? एकनाथ शिंदेंचा दावा, सिद्धरामय्यांची प्रतिक्रिया
3
'घोटाळ्याच्या चौकशीसाठी भुजबळांनी...';राऊतांचे मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप, थेट मोदींना लिहीलं पत्र
4
पेट्रोल भरायला आला अन् काळाने घात केला; घाटकोपर दुर्घटनेत युवकाचा दुर्दैवी अंत
5
EPFO ची कोट्यवधी लोकांसाठी गूड न्यूज! घर, लग्न, आजार, शिक्षणासाठी ऑटो क्लेम सोल्युशन लाँच; पाहा
6
पीओकेमधील गोंधळामुळे पाकिस्तान सरकारने गुडघे टेकले! २३ अब्ज रुपयांचा निधी जाहीर
7
LICची लखपती स्कीम! केवळ रोज ₹४५ रुपये जमा करून मिळवू शकता ₹२५ लाख; पाहा संपूर्ण डिटेल
8
काशी-वाराणसीतील मराठी समाज मोदींच्या पाठिशी; रोड शोमध्ये पंतप्रधानांचं मराठमोळं स्वागत
9
कोणताही मूर्ख माणूस असा उघडपणे बॅगा घेऊन पैसे वाटप करू शकतो का? राऊतांच्या दाव्यांवर शिंदे गटाचे प्रत्युत्तर
10
ईशा गुप्ताने केले आहेत Eggs Freeze, म्हणाली- "मी आज ३ मुलांची आई असते, पण..."
11
'कदम, दरेकर भाजपामध्ये गेल्यावर तोंडात दात नव्हते का?, सुषमा अंधारेंचा राज ठाकरेंवर पलटवार
12
बेपर्वाईचे १४ बळी,७८ जखमी; घाटकोपरला पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले, अवकाळी पावसाचा तडाखा
13
आजचे राशीभविष्य १४ मे २०२४; सूर्य वृषभेत, दलाली, व्याज, कमिशनमधून मोठ्या धनलाभाची शक्यता
14
महामुंबईला अवकाळीचा तडाखा; मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, रायगड, पालघरला पावसाने झोडपले
15
राज्यभरातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा: CM एकनाथ शिंदे, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
16
“मुझे बचाव, मैं शेड के नीचे फस गया हूँ”; होर्डिंगखाली दबलेल्या जखमीची सुटका
17
...तर पाकला हातात बांगड्या घालायला लावू! अणुशक्तीवरुन इंडिया आघाडीवर PM मोदींचा घणाघात
18
महाराष्ट्रात टक्का वाढेना; देशातील ९६ मतदारसंघात सरासरी ६६ टक्के मतदान
19
सावत्र लेक दिया मिर्झाला म्हणत नाही आई, अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली- "ती मला..."
20
प्रश्न: विवाह कधी करणार? राहुल गांधी म्हणाले, आता लवकरच करावा लागेल...

कृषीला गती देणारा लोकमत अ‍ॅग्रोत्सव!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2018 4:43 AM

सिंधूच्या खोऱ्यापासून भरभराटीला आलेली कृषी संस्कृती भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा झाली.

सिंधूच्या खोऱ्यापासून भरभराटीला आलेली कृषी संस्कृती भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा झाली. काळाच्या ओघात कृृषी क्षेत्रात अनेक बदल झाले. तरीही देशाच्या विकासात भरीव योगदान देत कृषी क्षेत्राचा जीडीपी जगात दुसºया स्थानी आहे. वर्षाला ४०० अब्ज उत्पादन असलेले कृषी क्षेत्र विज्ञान तंत्रज्ञानाच्या साहाय्याने नैसर्गिक आणि मानवनिर्मित संकटांवर मात करून एकेक पाऊल पुढे जात आहे. कृषी क्षेत्राच्या वाटचालीला गती देण्याचा भरीव प्रयत्न म्हणजे ‘लोकमत’चा अ‍ॅग्रोत्सव!लोकमत अ‍ॅग्रोत्सवाचा केंद्रबिंदू आहे तो शेती आणि शेतकरी. त्याच अनुषंगाने महाराष्ट्रातील विदर्भ, खान्देश, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र या चार विभागांतील नागपूर, जळगाव, औरंगाबाद आणि पंढरपूर या शहरांत प्रत्येकी चार दिवस हा कृषी पंढरीचा उत्सव होणार आहे. लोकमत अ‍ॅग्रोत्सवात दीडशेहून अधिक स्टॉल्स लावण्यात येणार असून, दोन लाखांहून अधिक लोक भेट देणार आहेत.मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे त्या त्या विभागातील एक पीक निवडण्यात आले आहे. यात संत्रा (नागपूर), केळी (जळगाव), कापूस (औरंगाबाद), डाळिंब (पंढरपूर) यांचा समावेश आहे. प्रदर्शनात त्या त्या विभागातील निवडलेल्या पिकांच्या उत्पादनवाढीसाठी धोरणे आणि आव्हाने यावर चर्चा केली जाणार आहे.प्रत्येक विभागातील चारदिवसीय अ‍ॅग्रोत्सव शेतकरी आणि शेतीशी संबंधित सर्वांसाठी वाटसरूच ठरणार आहे. शासनाची कृषी धोरणे, मुख्य पिकांचे मूल्य, शाश्वत शेती, पाण्याचे नियोजन आणि सिंचन तंत्रज्ञान, कृषी क्षेत्राच्या वाढीत शासकीय संस्थांची भूमिका, शेतीतील तांत्रिक सुधारणा आणि आधुनिक साहित्य, कृषी विमा यासह एकूण कृषी क्षेत्रातील सुधारणांवर कृषी क्षेत्रातील तज्ज्ञ आणि शेतकरी यांच्यात चर्चा घडवून आणली जाणार आहे.एकीकडे कृषी क्षेत्राला दिशा दाखवणाºया आणि नव्याचा शोध घेणाºया यशोगाथा झळकत आहेत, तर दुसरीकडे नैसर्गिक साधनांचा तुटवडा, ग्रामीण आणि शहरी उत्पन्नातील वाढती दरी यामुळे शेतकरी आत्महत्यांसारखा प्रश्न उग्र झाला आहे. सुदैवाने यात नव्याने पाऊल ठेवणाºया सुशिक्षित पिढीने आशावाद वाढवला आहे. या पिढीने पारंपरिक पद्धतीला नवशोधांची जोड देत शेतीला उद्योगाचे स्वरूप देण्यात यश मिळवीत आहे. कृषी क्षेत्राच्या वाढीत महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर राहिला आहे. शेती क्षेत्रातील बदलांसाठी धडपडणाºया. तसेच शेतकºयांना प्रेरणा देणाºया, शेतीत नवतंत्रज्ञान विकसित करणाºया आणि शोध लावलेल्या शेतकरी, संशोधकांच्या गौरवाने प्रत्येक अ‍ॅग्रोत्सवाचा समारोप होणार आहे. देशातील सर्वात मोठा कृषी पुरस्कार असलेल्या अ‍ॅग्रोत्सवात चार विभागांतील जवळपास दहा हजार शेतकरी सहभागी होणार आहेत. नामांकित ज्युरी वीस श्रेणीतील वीस पुरस्कारांसाठी विजेत्यांची निवड करणार आहेत.>पूर्वी कधी न झालेला उत्सव!शेती येणाºया नव्या पिढीला आणि कृषी क्षेत्राला अधिक सशक्त करण्यासाठी होत असलेला उत्सव म्हणजे अ‍ॅॅग्रोत्सव २०१८-१९. या माध्यमातून दोन लाखांहून अधिक शेतकरी जोडले जाणार आहेत. त्याचबरोबर मुद्रित आणि डिजिटल माध्यमातून कृषी क्षेत्राचा विस्तारीकरण करण्याचा प्रयत्न होणार आहे. कृषी क्षेत्रातील विशिष्ट समूहांशी थेट संपर्क करण्याची सुवर्र्णसंधी अ‍ॅग्रोत्सवाच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. या अग्रोत्सवाच्या अधिक माहितीसाठी मोविन मेन्झेस (मो.नं. ७४००१९९९३९) आणि प्रशांत पाटील (मो.नं. ९७६६९२८६८७) यांच्याशी संपर्क साधावा. लोकमत अ‍ॅग्रोत्सवाचा नियोजित कार्यक्रम असा : नागपूर - १९ ते २१ जानेवारी २०१८ (रेशीम बाग). औरंगाबाद- २५ ते २८ जानेवारी २०१९ (कासलीवाल तापडिया मैदान). जळगाव - २ ते ५ फेबु्रवारी २०१९ (जी.एस.मैदान/सागर पार्क). पंढरपूर - १३ ते १६ फेब्रुवारी २०१९ (कृषी उत्पन्न बाजार समिती मैदान).