Group housing projects and smart villages will be implemented in 100 villages | १०० गावांमध्ये समूह गृहनिर्माण प्रकल्प, स्मार्ट व्हिलेज साकारणार
१०० गावांमध्ये समूह गृहनिर्माण प्रकल्प, स्मार्ट व्हिलेज साकारणार

मुंबई : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पथदर्शी प्रकल्प म्हणून राज्यातील १०० गावांमध्ये समूह गृहनिर्माण प्रकल्प (ग्रुप हौसिंग) राबवून स्मार्ट व्हिलेज साकारण्यात येणार आहेत, अशी माहिती महामंडळाचे सहअध्यक्ष राजेंद्र मिरगणे यांनी पत्रपरिषदेत दिली.
महामंडळाने नुकतेच पुणे येथे १० हजार घरांच्या आणि भुसावळ (जि. जळगाव) येथे पाच हजार घरांच्या प्रकल्पाला मान्यता दिली असून सोलापूर येथे ११ हजार घरांच्या प्रकल्पाला या महिन्यात मान्यता देण्यात येईल. याशिवाय ७५ हजार घरांचे प्रकल्प मान्यता प्रक्रियेत आहेत. डिसेंबरपर्यंत पाच लाख घरांच्या प्रकल्पांना मान्यता देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.
सोलापूर येथे पोलीस, होमगार्ड, शासकीय कर्मचारी यांच्यासाठी प्रत्येकी एक समर्पित गृहप्रकल्पांना मान्यता देण्यात आली आहे. या पथदर्शी प्रकल्पांच्या यशस्वीतेनंतर अशाच प्रकारे सर्व महानगरे आणि जिल्ह्याच्या ठिकाणी विविध घटकांसाठी समर्पित प्रकल्प राबविण्यावर भर देण्यात येणार आहे.


Web Title: Group housing projects and smart villages will be implemented in 100 villages
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.