माळीणसाठी सरसावले कष्टक:यांचे हात
By Admin | Updated: August 2, 2014 23:21 IST2014-08-02T23:21:46+5:302014-08-02T23:21:46+5:30
माळीण दुर्घटना ग्रस्तांसाठी सरकारने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मदत देण्याची घोषणा केल्यानंतर कष्टक:यांनी तातडीने प्रतिसाद देत शनिवारी 2क् हजार रुपयांची मदत दिली आहे.

माळीणसाठी सरसावले कष्टक:यांचे हात
पुणो : माळीण दुर्घटना ग्रस्तांसाठी सरकारने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मदत देण्याची घोषणा केल्यानंतर कष्टक:यांनी तातडीने प्रतिसाद देत शनिवारी 2क् हजार रुपयांची मदत दिली आहे. त्यांच्यासह 31 हजार रुपये जिल्हा प्रशानाकडे दिवसभरात जमा झाले.
दुर्घटनाग्रस्त गावाला मदत देण्यासाठी स्वयंसेवी संस्था, सार्वजनिक मंडळे व इच्छुकांची गर्दी होत आहे. त्यामुळे मदतकार्यात आडथळे निर्माण होत आहेत. त्या पाश्र्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने दुर्घटनाग्रस्त माळीण गावाला मदत करण्यासाठी ‘मुख्यमंत्री सहायता निधी’ या नावाने धनादेश देण्याचे आवाहन शुक्रवारी करण्यात आले होते. त्याला प्रतिसाद देत कागद, काच, पत्र कष्टकरी पंचायतीने 2क् हजार रुपयांचा धनादेश दिला. तसेच अजित संचेती यांनी अकरा हजार रुपयांचा धनादेश दिला असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश जाधव यांनी दिली़ पावसाचा जोर कमी झाल्याने मदतीच्या कामाचा वेग वाढला आहे. ढिगारा उपसण्याचे काम 6क् ते 65 टक्के झाले आहे. सोमवार र्पयत हे काम पूर्ण होणो अपेक्षित असल्याचे जाधव म्हणाले. जुन्या विधानभवनातील जिल्हाधिकारी कार्यालयात मदत स्वीकारण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी क्2क्-2612337क् या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे. कार्यालयाकडे मदतीचा ओघ अव्याहतपणो सुरू आहे.
(प्रतिनिधी)
4माळीण गावावर आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे दुर्घटनाग्रस्त झालेल्यांना सुमन लोकसेवा संस्थेच्यावतीने मदत करण्यात आली. त्यांनी ग्रामस्थांना अन्न व फळांचे वाटप केले. याबाबत संस्थेचे डॉ. ज्ञानेश्वर मुंडलिक म्हणाले, माळीण गावावर आलेल्या आपत्तीमध्ये अनेकांचे घर उध्वस्त झाले. पण धैर्याने याविरूध्द लढणा:या गावक:यांना मदतीचा हात आम्ही दिला आहे.
माळीण गावात औषधफवारणीसाठी पथक तयार
4पुणो : माळीण गावात डोंगर कोसळून झालेल्या दूर्घटनेस चार दिवस लोटले आहेत. या दूर्घटनेतील तब्बल 150 हून अधिक गावकरी गाडले गेली असल्याची शक्यता असून त्यातील जवळपास 75 जणांचे मृतदेह मातीच्या ढिगा-यातून बाहेर काढण्यात आले आहे. मात्र, आता या गावात दरूगधी पसण्यास सुरूवात झाली असून रोगराई पसरण्याचा धोकाही निर्माण झाला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाकडून माळीण मध्ये औषध फवारणीसाठी स्वतंत्र पथक तयार ठेवण्याच्या सूचना महापालिकेस देण्यात आल्या आहेत.
4माळीण मध्ये अद्यापही मृतदेह काढण्याचे काम सुरू आहे. मात्र, मृतदेह कुजण्यास सुरूवात झाल्याने गावांमध्ये डास तसेच माशांचा प्रादूर्भाव वाढला आहे. या शिवाय दरूगधीही वाढली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाकडून औषध फवारणीसाठी पालिकेस स्वतंत्र पथक तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ही पथक फवारणीसाठीचे पंप तसेच औषधांसह तयार ठेवण्यात आली असून आदेश मिळताच ती माळीणकडे रवाना करण्यात येणार असल्याचे पालिकेचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी गणोश सोनूने यांनी सांगितले.
4या शिवाय डोंगरावरून वाहत येणा-या पाण्यात मृतदेहही वाहून जाण्याची शक्यता असल्याने गावातील नदीत तपास करण्यासाठी पालिकेकडून तीन रबरी बोट पाठविण्यात आल्या आहेत. या शिवाय जखमी व्यक्तींना वाहून नेण्यासाठी तसेच मृतदेह बंदीस्त ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार, सुमारे 170 संजिवनी स्ट्रेचरही पाठविण्यात आल्याचे सोनूने यांनी सांगितले.
आत्तार्पयत 5क् टक्केच ढिगारा झाला उपसला
घोडेगाव : माळीण येथील दुर्घटनेला चार दिवस उलटून गेले तरी अद्याप 5क् टक्केही ढिगारा उपसून झालेला नाही. त्यामुळे आणखी काही जेसीबी लावण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
एनडीआरएफचे जवान दिवस-रात्र कार्यरत आहेत. काल पावसाने थोडीशी उघडिप दिली होती. मात्र, आजपासून पुन्हा पावसास सुरूवात झाली. त्यामुळे चिखल वाढला आहे. ज्या गतीने हे काम सुरू आहे त्याचा विचार करता अजून 4 ते 5 दिवस हे काम चालण्याची शक्यता आहे. मदत कार्य मध्येच थांबल्यास आपल्या कुटूंबांच्या सदस्यांची चिंता माळीणवासीयांना भेडसावू लागली आहे. (वार्ताहर)