नाना शंकरशेट यांना अभिवादन
By Admin | Updated: August 1, 2016 04:44 IST2016-08-01T04:44:50+5:302016-08-01T04:44:50+5:30
महापालिका सभागृहातील त्यांच्या प्रतिमेस उपमहापौर अलका केरकर यांनी रविवारी सकाळी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले

नाना शंकरशेट यांना अभिवादन
मुंबई : जगन्नाथ तथा नाना शंकरशेट यांच्या १५१व्या पुण्यतिथीनिमित्त महापालिका सभागृहातील त्यांच्या प्रतिमेस उपमहापौर अलका केरकर यांनी रविवारी सकाळी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी पालिका सभागृहात उपस्थितांशी संवाद साधताना अलका केरकर म्हणाल्या की, १८-१९व्या शतकात मुंबई शहर विकसित करताना नाना शंकरशेट यांनी मुंबई शहर ‘स्मार्ट सिटी’ होण्याच्या दृष्टीने सर्वतोपरी प्रयत्न केले. त्या स्वरूपाचे नियोजन करून विकसित करण्याचा प्रयत्न केला आहे. यासोबतच मुलींच्या शिक्षणासाठी शाळा सुरू केल्या, अंधश्रद्धा निर्मूलनासाठी कार्य केलेले आहे. नाना शंकरशेट यांचे अतुलनीय कार्य लक्षात घेता, त्यांचे भव्य असे स्मारक होत असताना महापालिका त्याकरिता सर्वतोपरी सहकार्य करेल. (प्रतिनिधी)