शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

अधिक पारदर्शकतेसाठी जमिनींचे व्यवहार महारेराच्या कक्षेत यावेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 04:34 IST

महारेरा हा विकासक आणि ग्राहकांमधील व्यवहारावर लक्ष ठेवून आहे. मात्र या क्षेत्रातील इतर व्यवहारही महारेरांतर्गत येण्याची गरज आहे. कारण या क्षेत्रात सर्वात जास्त अपारदर्शकता आहे. त्यामुळे निवासी आणि व्यावसायिक गाळ्यांच्या व्यवहारात पारदर्शकता असली, तरी भविष्यात जमिनींचे व्यवहारही महारेराच्या कक्षेत येण्याची गरज आहे. त्याचा फायदा नक्कीच निवासी आणि व्यावसायिक गाळ्यांच्या खरेदी-विक्रीवर होईल.

- अमित हावरेमहारेरा हा विकासक आणि ग्राहकांमधील व्यवहारावर लक्ष ठेवून आहे. मात्र या क्षेत्रातील इतर व्यवहारही महारेरांतर्गत येण्याची गरज आहे. कारण या क्षेत्रात सर्वात जास्त अपारदर्शकता आहे. त्यामुळे निवासी आणि व्यावसायिक गाळ्यांच्या व्यवहारात पारदर्शकता असली, तरी भविष्यात जमिनींचे व्यवहारही महारेराच्या कक्षेत येण्याची गरज आहे. त्याचा फायदा नक्कीच निवासी आणि व्यावसायिक गाळ्यांच्या खरेदी-विक्रीवर होईल.महारेरा आला त्या वेळी विकासकांच्या मनात बऱ्याच शंका होत्या. मात्र अधिकारी वर्गानेतीन महिन्यांत घेतलेल्या बैठकांमुळे मोठ्या प्रमाणात शंकानिरसन झाले. म्हणूनच १० हजारांहून अधिक प्रकल्पांची नोंदणी झाली. रिअल इस्टेट क्षेत्रात पहिल्यांदाच एवढी मोठी घडामोड झाली असावी. सर्व प्रक्रिया आॅनलाइन, हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा ठरला. अन्यथा शासकीय कार्यालयांत दफ्तर दिरंगाईची अनेक प्रकरणे आपण पाहतो. आॅनलाइनमुळे अवघ्या सात दिवसांत नोंदणी करण्याचे काम महारेराने करून दाखवले. त्यामुळे बांधकाम क्षेत्रात आज बरेच बदल दिसत आहेत.महत्त्वाचा बदल म्हणजे नामांकित विकासक प्रथम सर्व परवानग्या घेऊन मग प्रकल्पाची घोषणा करायचे. मात्र काही विकासक परवानग्या मिळण्यापूर्वीच प्रकल्पाची घोषणा करायचे. हे नियमबाह्य ठरू शकते. म्हणूनच अशा नियमबाह्य काम करणाºया विकासकांना नियमात राहून काम करणाºया विकासकांकडून स्पर्धेला तोंड देणे कठीण जात होते. आता या गोष्टींना महारेराच्या येण्याने रोख लागली आहे. त्यामुळे ही अनधिकृत स्पर्धाच संपली आहे. गेल्या वर्षभरात नियमबाह्य काम करणाºयांना या क्षेत्रातून बाहेर पडावे लागले. ग्राहकांमधील जनजागृतीही अधिक वाढली आहे. त्यामुळे महारेरा नोंदणी नसेल, तर ग्राहक घर घेतच नाहीत. इतकेच नव्हे, तर जाहिरातीवरही महारेरा क्रमांक आहे का, याची पाहणी ग्राहक करतात.आज बाजारात वेगवेगळ्या प्रकारची मागणी आहे. महारेरामुळे प्रकल्पांना मिळालेल्या मंजुºया पारदर्शकपणे ग्राहकांना पाहता येतात. शिवाय जो विकासक सर्व नियमांचे पालन करतोय, त्याची विश्वासार्हताही वाढली आहे. याआधी विकासकांना गृह प्रकल्पात घरांची विक्री करताना ग्राहकांचा विश्वास जिंकण्यासाठी हातात मोठी फाइल घेऊन फिरावे लागत होते. आता आॅनलाइन झाल्यामुळे लोक घरबसल्या मंजुºया तपासतात. त्यामुळे विश्वासार्हता वाढून लोकांची निर्णय क्षमताही वाढली आहे.शासन कठोर असले, तर चोरी होत नाही; त्याप्रमाणेच दंड आकारल्याशिवाय नियमांचे पालन होणार नाही. सुरुवातीला बहुतांश विकासकांमध्ये महारेरासंदर्भात भीती होती. मात्र आता सर्वच विकासक खुल्या दिलाने महारेराचे स्वागत करत आहेत. कारण महारेरामुळे बांधकाम क्षेत्रात एक शिस्त निर्माण झाली. कोणताही विकासक अव्वाच्या सव्वा आश्वासने देऊ शकत नाही. महारेरामुळे जे देऊ शकतात, त्याचाच उल्लेख विकासकांना करावा लागत आहे.बेछूट जाहिरातींनाही महारेरामुळे लगामलागला आहे. दंडामुळेच या नियमांचे पालन होत आहे.प्रकल्पाचे बांधकाम पूर्ण होण्यासाठी बँक खात्यात ७० टक्के रक्कम ठेवण्याच्या नियमांत बदल करण्याची गरज वाटते. त्यात थोडीशी लवचीकता असायला हवी. कारण प्रत्येक प्रकल्पात ७० टक्के रक्कम ही बांधकाम खर्चासाठी लागत नाही. काही प्रकल्पांत बांधकाम खर्च ७० टक्क्यांहून कमी असतो, तर जमिनीचा खर्च हा जास्त असतो. जागेनिहाय ही टक्केवारी बदलत असते. त्यामुळे प्रकल्पात जेवढा बांधकाम खर्च अपेक्षित आहे, तितकीच रक्कम बँक खात्यात ठेवण्याची तरतूद करण्याची गरज वाटते. ग्राहकांसाठी सर्व माहिती उघड करणे, प्रकल्पात पारदर्शकता ठेवणे हे रिअल इस्टेट क्षेत्रासाठी लाभदायक ठरेल. रिकामी घरे आणि विक्री झालेली घरे याची माहिती देणे विकासकासाठीही फायद्याचे आहे. एकंदरीतच संपूर्ण क्षेत्रावर त्याचा सकारात्मक परिणाम दिसेल.(लेखक हे हावरे प्रॉपर्टीजचे मुख्य कार्यकारी अधिकारी व संयुक्त व्यवस्थापकीय संचालक आहेत)

टॅग्स :GovernmentसरकारReal Estateबांधकाम उद्योग