सडलेला गहू आदिवासींच्या माथी
By Admin | Updated: September 1, 2016 14:55 IST2016-09-01T14:55:02+5:302016-09-01T14:55:02+5:30
डहाणू तालुक्याच्या आदिवासी भागात आदिवासी लाभार्थ्यांना पुरवठा विभागाकडून सडलेला गहू पुरविण्यात आला जनावरच्याही खाण्याचा लायकीचा नाही.

सडलेला गहू आदिवासींच्या माथी
>सुरेश काटे
ऑनलाइन लोकमत
तलासरी, दि. १ - डहाणू तालुक्याच्या आदिवासी भागात आदिवासी लाभार्थ्यांना पुरवठा विभागाकडून सडलेला गहू पुरविण्यात आला जनावरच्याही खाण्याचा लायकीचा नाही. हे ध्यानात आल्यावर संतापलेल्या आदिवासी लाभार्थ्यांनी तो रस्त्यावर ओतून डहाणू पुरवठा विभागाचा निषेध व्यक्त करून आदिवासींना सडलेला गहू पुरवठा करणाऱ्या पुरवठा अधिकाऱ्याची चौकशीची मागणी केली आहे
धान्य गोदाम मध्ये अंत्योदय योजनेचा सडलेला गहू आहे हे माहित असताना डहाणू च्या पुरवठा विभागाने तो लाभार्थ्यांना विक्री करण्या करिता रेशन दुकानदाराणा दिला. महिना अखेरीस आलेला हा सडलेला गहू खरेदी केल्यावर तो जनावराच्याही खाण्याचा लायकीचा नाही हे दिसून आल्यावर संतापलेल्या आदिवासी लाभार्थ्यांनी तो हळद पाडा येथे रस्त्यावर ओतून शासनाचा व पुरवठा विभागाचा निषेध व्यक्त केला.
हळद पाडा येथील आदिवासी लाभार्थी सुरेखा जयवंत रावते (सरपंच हळद पाडा ), सविता सखाराम बीज , रमेश वनजी सवरा , वनिता सुनील कोम, वंदन रुपजी घोरखाना , संगीता रामा डोल्हारे , गुलाब सखाराम भावर, दत्तू जाना उमतोल, संदीप सावजी दळवी , रमेश जाना रावते , जानी मानकि दळवी , लता नवश्या वरठा, लाडकी देऊ रावते, नवशी जयराम दुमाडा , संगीता देऊ दळवी , जस्वती विष्णू रावते, मीना मनू रावते, नाणू जाणू उमतोल इत्यादी सह अनेक कार्ड धारकांनी सडके धान्य रस्त्यावर ओतले.
याबाबत हळदपाडाच्या सरपंच सुरेखा जयवंत रावते यांनी सांगितले सडक्या धान्य बाबत आम्ही रेशन दुकानदार कडे विचारणा केली असता गोदाम मधूनच सडलेला गहू विक्री साठी आला असल्याचे त्यांनी आम्हाला सांगितले व तो तुम्हाला घ्यावा लागेल असे सांगितले. म्हणून आम्ही सडका गहू रस्त्यावर ओतला ज्यामुळे तरी आदिवासींच्या जीवाशी खेळणा ऱ्या सरकारला जाग येईल
गहू खराब आहे या बाबत वरिष्ठ अधिकारी याना कळविण्यात आले आहे---गायकवाड , गोदाम पालक डहाणू
खराब धान्याचे पंचनामे करण्यास सांगितले आहे- तहसीलदार डहाणू