महावितरणच्या कर्मचाऱ्यांना 12 हजार 500 रूपये सानुग्रह अनुदान जाहीर

By Admin | Updated: October 25, 2016 17:31 IST2016-10-25T17:31:49+5:302016-10-25T17:31:49+5:30

दिवाळीनिमित्त महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषण या तिन्ही कंपन्यांतील कर्मचाऱ्यांना साडेबारा हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान

A grant of Rs. 12,500 for SanjuGha Grant for the employees of MSEDCL | महावितरणच्या कर्मचाऱ्यांना 12 हजार 500 रूपये सानुग्रह अनुदान जाहीर

महावितरणच्या कर्मचाऱ्यांना 12 हजार 500 रूपये सानुग्रह अनुदान जाहीर

>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 25 ऑक्टोबर 2016 : दिवाळीनिमित्त महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषण या तिन्ही कंपन्यांतील कर्मचाऱ्यांना साडेबारा हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान राज्याचे ऊर्जामंत्री ना. श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केले.  तसेच कंत्राटी कामगारांना सहा हजार रुपये सानुग्रह अनुदान म्हणून देण्यात येणार आहे.  
 
प्रकाशगड मुख्यालयात ऊर्जामंत्री यांच्या अध्यक्षतेखाली सानुग्रह अनुदानाबाबत बैठक झाली. यावेळी ऊर्जामंत्र्यांनी सानुग्रह अनुदानाबाबतची घोषणा केली.  बैठकीला प्रधान सचिव (ऊर्जा) तथा महानिर्मितीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. बिपीन श्रीमाळी, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. संजीव कुमार, महापारेषणचे व्यवस्थापकीय संचालक श्री. राजीव कुमार मित्तल यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.ऑ

Web Title: A grant of Rs. 12,500 for SanjuGha Grant for the employees of MSEDCL